esakal | नांदेड : कोरोनाचा एकही रुग्न नसलेलं जिल्ह्यातील गांव; कोणते ते वाचा ?

बोलून बातमी शोधा

निवघा कोरोनामुक्त
नांदेड : कोरोनाचा एकही रुग्न नसलेलं जिल्ह्यातील गांव; कोणते ते वाचा ?
sakal_logo
By
बंडू माटाळकर

निवघाबाजार ( जिल्हा नांदेड ) : आत्तापर्यंत कोरोना रुग्न सापडलाच नाही, तर गांवात कोणत्याच बिमारीची लाट नाही. ताप नाही, सर्दी नाही, खोकला नाही! एवढेच नाही तर गावात कोन्ही आजारी पण नसल्याने अॅबुलन्सचा कर्कश आवाज पण नाही. गांव सुखी व आनंदी आहे.

येथून जवळच असलेलं निवळा (ता. हदगांव) हे गांव या गावची लोकसंख्या १, २४५ गावात सर्व सुखी व समृध्द. या गावात आत्तापर्यंत कोराणाचा संसर्ग झालाच नाही. हे विशेष, ग्रामस्थानी कोरोनाची लागन होऊ द्यायचीच नाही असे ठरविले, व गावात जनजागृती व त्याचे तंतोतंत पालन केले. सुरुवातीस गांव स्वच्छ करुन गावात येणारे रस्ते सिल केले. जमावबंदी केली. कामाशिवाय बाहेर कोणीही यायचे नाही. आलेच तर मास्क लावणे, हाथ नेहमी स्वच्छ धुणे, या नियमाचे सर्वानी तंतोतंत पालन करण्याचे ठरविले. यामुळे या गावात आत्तापर्यंत कोरोनाचा शिरकाव झालाच नाही. गावातील ८० टक्के ग्रामस्थानी लस घेतली. उर्वरीत लवकरच लस घेणार आहेत. गावात सामुहीक कार्यक्रम बंद आहेत. गावात येण्यासाठी इतर गावातील ग्रामस्थाना पावबंद केल आहे. यामुळे गावात कोणीही बिमार नाही.

हेही वाचा - कोरोनाकाळात वाढतायेत १०८ वरील कॉल; MEMS रुग्णांसाठी सदैव तत्पर

संपूर्ण भारतात कोरोनाने हाहाकार माजविला असून, प्रत्येक खेड्यापाड्यात रुग्न संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तर प्रत्येक गावात मृत्यूचे तांडव वाढत आहेत कुटुंबच्या कुटुंब या कोरोनात उद्वस्त होत आहे. दवाखान्यात बेड मिळत नाही, तर ऑक्सीजन अभावी रुग्न दगावत आहेत. या सर्व बाबीला अपवाद ठरलं आहे निवळा हे गांव...

सगळीकडे कोरोनाने हाहाकार केला असून रुग्न संख्या आटोक्यात आणण्यासाठी शासनासह प्रत्येक ग्रामपंचायत प्रयत्नाची परकाष्टा करीत आहे. परंतू निवळा येथील प्रत्येक ग्रामस्थानी गावात कोरोनाचा शिरकाव होऊ द्यायचा नाही असं ठरविल्याने व कोरोनाची लागन झाल्यावर प्रयत्न करण्यापेक्षा गावकऱ्यांच्या मदतीने आम्ही आधीच प्रयत्न केल्याने गावात आत्तापर्यंत एकही रुग्न नाही. व येत्या काही दिवसात आम्ही गावात कोरोनाची टेस्टींग करणार आहो.

- श्री. तावडे, ग्रामसेवक

संपादन- प्रल्हाद कांबळे