esakal | जिल्ह्यात वाढतोय कोरोनाचा प्रादूर्भाव, बुधवारी ३६ रुग्ण कोरोनामुक्त, ५८ जण पॉझिटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

file Photo

बुधवारी (ता.२५) एक हजार ८९५ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामधील एक हजार ८११ निगेटिव्ह, ५८ अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २० हजार १६१ इतकी झाली आहे. 

जिल्ह्यात वाढतोय कोरोनाचा प्रादूर्भाव, बुधवारी ३६ रुग्ण कोरोनामुक्त, ५८ जण पॉझिटिव्ह 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड -जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढत आहे. बुधवारी (ता. २५) ३६ रुग्ण कोरोनामुक्त, दोघांचा मृत्यू आणि ५८ नवीन रुग्णांची भर पडल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले. 
मंगळवारी (ता.२४) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅब तपासणीतील अहवालात बुधवारी (ता.२५) एक हजार ८९५ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामधील एक हजार ८११ निगेटिव्ह, ५८ अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २० हजार १६१ इतकी झाली आहे. 

बुधवारी दिवसभरात हदगावच्या शासकीय रुग्णालयातील कोरोना सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या हदगाव तालुक्यातील कामारी येथील पुरुष (वय ५०) आणि मुखेड कोविड सेंटरमधील मुखेड फुले नगर पुरुष (वय- ६०) या दोन कोरोना बाधित पुरुषांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ५४७ बाधितांचा मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा- नांदेड : किनवट सराफांची अशीही बनवाबनवी, २२ कॅरेटच्या नावाखाली ग्राहकांची लूट ​

कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १९ हजार १६ 

दुसरीकडे श्रीगुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय - चार, महापालिकेंतर्गत - १४, जिल्हा रुग्णालयात - पाच, हदगाव- एक, मुखेड - एक, धर्माबाद- चार आणि खासगी कोविड केअर सेंटरमधील - सात असे ३६ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातुन सुटी देण्यात आली. आतापर्यंत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १९ हजार १६ इतकी झाली आहे. 

हेही वाचले पाहिजे- नांदेड : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपी माहूर पोलिस ठाण्यातून पसार ​

१६ कोरोना बाधित रुग्णांची प्रकृती गंभीर 

बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात नांदेड महापालिका क्षेत्रात - २३, किनवट - चार, भोकर - तीन, कंधार - एक, देगलूर - दोन, नायगाव - एक, मुखेड- चार, हदगाव- १३, हिमायतनगर - एक, माहूर - एक, लोहा - एक, उमरी - एक, परभणी - एक, औरंगाबाद - एक आणि उत्तरप्रदेश - एक असे ५८ कोरोना बाधित आढळुन आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या २० हजार १६१ इतकी झाली आहे. त्यापैकी १९ हजार १६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. ५४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४०७ बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामधील १६ कोरोना बाधित रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. बुधवारी संध्याकाळी उशिरापर्यंत ४८७ स्वॅबची चाचणी सुरु होती. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९४ टक्के आहे. 

कोरोना मीटर ः 

बुधवारी पॉझिटिव्ह रुग्ण - ५८ 
बुधवारी कोरोनामुक्त -३६ 
बुधवारी मृत्यू - दोन 
एकूण पॉझिटिव्ह - २० हजार १६१ 
एकूण कोरोनामुक्त - १९ हजार १६ 
एकूण मृत्यू - ५४७ 
उपचार सुरु - ४०७ 
गंभीर रुग्ण - १६ 
स्वॅब अहवाल प्रलंबित - ४८७  

 
 

loading image