Good news : आता कोरोना चाचणी लवकर होणार, मिळाल्या पाच हजार अॅन्टीजेन रॅपिडटेस्ट कीट

file photo
file photo

नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता प्रशासनाकडून नागरिकांची लवकर कोरोना चाचणी व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तसेच स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठातील लॅब बंद झाल्याने सर्व ताण शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाच्या लॅबवर आला. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर ताण येऊन वेळेत अहवाल मिळत नसल्याने नागरिकांना वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे आता अॅन्टीजेन रॅपीड टेस्ट करण्यात येणार असल्याने पाच हजार कीट उपलब्ध झाल्या आहेत. या किटद्वारे सोमवार (ता. २७) पासून कन्टेनमेन्ट झोननधील नागरिकांची तपासणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले. 

जिल्ह्याला पाच हजार टेस्ट उपलब्ध झाल्या आहेत. नांदेडला जवळपास पाचशे चाचण्या यशस्वी झाल्यानंतर या पाच हजार किट नव्याने उपलब्ध झाल्या आहेत. सोमवारपासून या कीटद्वारे कंटेनमेंट झोनमधील लक्षणे असलेल्या संशयित तसेच संक्रमणाची शक्यता असलेल्या नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. अवघ्या अर्धा ते एक तासात या तपासणीचा अहवाल मिळणार असल्याने कोणालाही अहवालाची प्रतीक्षा करण्याची गरज पडणार नाही. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तीनी काळजी घेऊन किंवा निर्धास्त राहतील.

हेही वाचा -  कोरोना इम्पॅक्ट : अधिष्ठाता डॉ. म्हस्के यांची कोल्हापूरला तडकाफडकी बदली
 
 पाच हजार किट जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीणमध्ये वितरित होणार

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर म्हणाले की, दुसऱ्या टप्प्यात आलेल्या पाच हजार किट नांदेड जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात वितरित केले जाणार आहेत. जिल्ह्यातील कंटेनमेंट झोनमध्ये बाधित रुग्णांच्या जवळून संपर्कात आलेल्या आणि लक्षणे असलेल्या नागरिकांची प्राधान्याने या कीटद्वारे तपासणी केली जाईल. त्याचबरोबर याच झोनमधील ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेले नागरिक रक्तदाब, मधुमेह, दमा असलेल्या रुग्णांची तसेच अधिक जोखीम असलेल्या फ्रन्टलाइनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चाचणी घेण्यात येणार आहे. यापूर्वी जिल्ह्यातील या कीटचा वापर करून कंटेनमेंट झोनमधील नागरिकांचा शोध घेऊन कमी कालावधीत त्यांचे अहवाल प्राप्त करून घेतले आहेत. वाचल्यामुळे बाधित रुग्णांचे निदान लगेच होत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होईल आणि निगेटीव्ह आढळलेल्या रुग्णांना घरी पाठवले जाईल.

अशा पद्धतीने संक्रमणाचा वेग नियंत्रणात ठेवता येईल

या प्रक्रियेमुळे संशयितांना कॉल सेंटरमध्ये जास्त काळ अडकून पडण्याची वेळ येणार नाही. तसेच उशिरा निधन झाल्यामुळे त्यांच्या संपर्कात येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढण्याऐवजी कमी होईल. अशा पद्धतीने संक्रमणाचा वेग नियंत्रणात ठेवता येईल. पाच हजार किटचा वापर केल्यानंतर आणखी तीस हजार किट मागण्याची तयारी आम्ही केली असून कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचे संक्रमण नियंत्रणात राहावे, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. तिसऱ्या टप्प्यात बाजारपेठ आणि गर्दीच्या ठिकाणी चाचण्या करुन नागरिकांना चिंतामुक्त करण्याचा विचार सुरु असल्याचे डॉ. भोसीकर यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन 

जिल्ह्यातील ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या तसेच ज्यांनी विदेश इतर राज्य किंवा इतर जिल्ह्यातील नांदेड जिल्ह्यात प्रवास केला. अशा सर्व नागरिकांची तपासणी करण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. यासाठी ट्रेस (शोध), टेस्ट (चाचणी) आणि ट्रीट (निदान) या ट्रिपल त्रिसूत्रीचा वापर करून त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. तालुका व शहर पातळीवर सर्वेक्षण अधिकाऱ्यांची या कामासाठी नियुक्ती केली असून इन्फ्लुएन्झा सदस्य आजारी व्यक्तींना सदस्य लक्षणे आढळून आल्यास आरोग्य विभागाच्या मोबाईलद्वारे चाचण्या केल्या जाणार आहेत. संबंधित व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपली माहिती भरून देण्यास पात्र नागरिकांना घरपोच सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com