esakal | नांदेडमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, सहा जण पाॅझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

Covid-19-Updates

नांदेडमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, सहा जण पाॅझिटिव्ह

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह Corona Positive रुग्णांची संख्या दिवसागणिक कमी होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासहित आरोग्य विभागाची Health Department देखील काही प्रमाणात चिंता कमी झाली आहे. रविवारी (ता.११) प्राप्त झालेल्या दोन हजार ३९७ अहवालांपैकी दोन हजार ३८० निगेटिव्ह, तर सहा व्यक्तींचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. आजच्या घडीला ५५ रुग्ण उपचार घेत असून एका बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. रविवारी दिवसभरात जिल्ह्यातील सात कोरोनाबाधितांना Corona औषधोपचारानंतर सुटी देण्यात आलेली आहे. उपचार सुरु असलेल्या गंभीर रुग्णांपैकी रविवारी एकाही बाधितांचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात Nanded आजवर एकूण मृत्यूची संख्या एक हजार ९०६ वर स्थिर आहे. एकूण बाधितांची संख्या ९१ हजार ३३८ एवढी झाली असून यातील ८८ हजार ७६९ रुग्णांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे. रविवारी बाधितांमध्ये नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रात दोन बाधित आढळले.nanded corona updates cases declines, 6 positive reported

हेही वाचा: Hingoli Rain Updates : हिंगोल जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पाऊस

नांदेड कोरोना मीटर

एकूण पॉझिटिव्ह - ९१ हजार ३३८

एकूण बरे - ८८ हजार ७६९

एकूण मृत्यू - एक हजार ९०६

रविवारी पॉझिटिव्ह - सहा

रविवारी बरे - सात

रविवारी मृत्यू - शुन्य

उपचार सुरु - ५५

loading image