esakal | Nanded Corona Update: नांदेडात कोरोनाचा प्रभाव ओसरला; २ रुग्णांचे निदान
sakal

बोलून बातमी शोधा

nanded corona

Nanded Corona Update: नांदेडात कोरोनाचा प्रभाव ओसरला; २ रुग्णांचे निदान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड: जिल्ह्यात शुक्रवारी (ता. ३०) प्राप्त झालेल्या दोन हजार १५३ अहवालापैकी दोन अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. जिल्ह्यातील सहा कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. आजच्या घडीला ४६ रुग्ण उपचार घेत असून यात तीन बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.

जिल्ह्यात उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के झाले आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ९० हजार १७४ एवढी झाली असून यातील ८७ हजार ४७३ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या दोन हजार ६५५ एवढी आहे. नांदेड महापालिका - एक, किनवट - एक असे एकूण दोन बाधित आढळले.

हेही वाचा: अब्दुल सत्तारांनी खिल्ली उडविताच उपनगराध्यक्ष साबेर खान संतापले

नांदेड कोरोना मीटर
एकुण बाधित - ९० हजार १७४
एकूण बरे - ८७ हजार ४७३
एकुण मृत्यू - दोन हजार ६५५
शुक्रवारी बाधित - दोन
शुक्रवारी बरे - सहा
शुक्रवारी मृत्यू - शून्य
उपचार सुरु - ४६
अतिगंभीर प्रकृती - तीन

loading image
go to top