esakal | नांदेड - दिवसाआड एका कोरोना बाधिताचा मृत्यू 

बोलून बातमी शोधा

file Photo

रविवारी (ता.२०) एक हजार २२० अहवाल प्राप्त झाले. यामध्ये एक हजार ७७६ निगेटिव्ह, ३९ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २१ हजार ६० इतकी झाली आहे.

नांदेड - दिवसाआड एका कोरोना बाधिताचा मृत्यू 
sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी अधिक होत आहे. रविवारी (ता. २०) प्राप्त झालेल्या अवहालात ३० कोरोना बाधित रुग्ण बरे, एकाचा मृत्यू तर ३९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दुसरीकडे काही दिवसांपासून दिवसाआड एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू होत असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे. 

शनिवारी (ता.१९) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी रविवारी (ता.२०) एक हजार २२० अहवाल प्राप्त झाले. यामध्ये एक हजार ७७६ निगेटिव्ह, ३९ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २१ हजार ६० इतकी झाली आहे. तर रविवारी उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या देगलूर तालुक्यातील टाकळी येथील पुरुष (वय ४५) यांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा ५६३ वर पोहचला आहे. 

हेही वाचा - नांदेड : रासायनिक खताच्या दरवाढीमुळे उकिरड्याचे फिटले पांग, शेणखताची मागणी वाढली! ​

३० कोरोना बाधित रुग्ण बरे 

रविवारी जिल्हा शासकीय रुग्णालयातील - नऊ, महापालिकेंतर्गत एनआरआय भवन, गृहविलगिकरण कक्षात - १०, हदगाव- दोन, मुखेड - दोन आणि खासगी रुग्णालयातील - सात असे ३० कोरोना बाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. उपचार घेऊन आतापर्यंत २० हजार कोरोना बाधित रुग्ण घरी पोहचले आहेत. 

हेही वाचले पाहिजे - नांदेड : दामिनी पथकाकडून गांजा जप्तीची कामगिरी, ग्रामीणचे गुन्हे शोध पथक तोंडघशी ​

१३ जणांची प्रकृती गंभीर 

नांदेड महापालिका क्षेत्राअंतर्गत २४, कंधार - एक, किनवट - एक, माहूर - एक, मुखेड - तीन, हिंगोली- एक, देगलूर - सहा आणि परभणी - एक असे ३९ कोरोना बाधित रुग्ण आढळुन आले आहेत. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या २१ हजार ६० इतकी झाली आहे. सध्या ३०० कोरोना बाधित रुग्णांवर औषधोपचार सुरू आहेत. रविवारी संध्याकाळी उशिरापर्यंत ५०८ जणांचे स्वॅब अहवाल तपासणी सुरु होती. उपचार सुरु असलेल्या रुग्णांपैकी १३ जणांची प्रकृती गंभीर आहे. 
 
नांदेड कोरोना मीटर 

रविवारी कोरोना पॉझिटिव्ह - ३९ 
रविवारी कोरोनामुक्त - ३० 
रविवारी मृत्यू - एक 
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - २१ हजार ६३ 
एकूण कोरोनामुक्त - २० हजार 
एकूण मृत्यू - ५६३ 
गंभीर रुग्ण - १३ 
स्वॅब अहवाल प्रतिक्षेत - ५०८