esakal | Nanded Corona Updates : नांदेडला दोघांना कोरोनाची बाधा
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

Nanded Corona Updates : नांदेडला दोघांना कोरोनाची बाधा

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड : जिल्ह्यात सोमवारी (ता.२०) प्राप्त ५२४ अहवालापैकी दोन अहवाल कोरोनाबाधित आले. दिवसभरात एका कोरोनाबाधितांना (Corona) औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली. आजच्या घडीला २५ रुग्ण उपचार घेत असून तीन बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०३ टक्के आहे. जिल्ह्यात (Nanded) एकुण बाधितांची संख्या ९० हजार ३०६ एवढी झाली असून यातील ८७ हजार ६३० रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात (Corona In Nanded) आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६५१ एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड महापालिका हद्दीत दोन बाधित आढळले.

हेही वाचा: अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार, पीडितेचा मृत्यू

सध्या २५ कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी सात, नांदेड महापालिकाअंतर्गत गृहविलगीकरण बारा, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृहविलगीकरण चार, खासगी रुग्णालयात दोन व्यक्ती उपचार घेत आहेत.

नांदेड कोरोना मीटर

एकुण स्वॅब- ७ लाख २५ हजार ८८८

एकुण निगेटिव्ह - ६ लाख २२ हजार ५७६

एकुण बाधित - ९० हजार ३०६

एकुण बरे - ८७ हजार ६३०

एकुण मृत्यू - २ हजार ६५१

उपचार सुरू - २५

अतिगंभीर प्रकृती - तीन

loading image
go to top