esakal | नांदेडची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल, तीन जण पाॅझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

नांदेडची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल, तीन जण पाॅझिटिव्ह

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : मागील सहा दिवसापासून जिल्ह्यातील Nanded मृत्यूचे प्रमाण शून्यावर आले आहे. दुसरीकडे जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेनी वाटचाल करत असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यातील कोरोना Corona पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एकही गंभीर नाही. गुरुवारी (ता. १५) प्राप्त झालेल्या एक हजार ३९४ अहवालापैकी एक हजार ३८३ निगेटिव्ह तर तीन व्यक्तींना नव्याने कोरोनाची लागण झाली आहे. आजच्या घडीला ५२ रुग्ण उपचार घेत असून गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यातील सहा कोरोनाबाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. उपचार सुरु असलेल्या रुग्णांपैकी गुरुवारी एकाही बाधितांचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात आजवर एकूण मृत्यूची संख्या एक हजार ९०६ वर स्थिर आहे.nanded covid new 3 cases reported glp88

जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ९१ हजार ३५० एवढी झाली असून, यातील ८८ हजार ७९४ रुग्णांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. गुरुवारी बाधितांमध्ये नांदेड महापालिका क्षेत्रात -दोन, बिलोली Biloli - एक असे तीन बाधित आढळले आहेत.

नांदेड कोरोना मीटर

एकूण पॉझिटिव्ह - ९१ हजार ३५०

एकूण बरे - ८८ हजार ७९४

एकूण मृत्यू - एक हजार ९०६

गुरुवारी पॉझिटिव्ह - तीन

गुरुवारी बरे - सहा

गुरूवारी मृत्यू - शुन्य

उपचार सुरु - ५२

loading image