esakal | Corona Updates : नांदेडमध्ये आज केवळ सहा जण कोरोनाबाधित
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

Corona Updates : नांदेडमध्ये आज केवळ सहा जण कोरोनाबाधित

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : जिल्ह्यात (Nanded) गुरूवारी (ता.२२) प्राप्त झालेल्या एक हजार ३१० अहवालांपैकी सहा अहवाल कोरोनाबाधित (Corona) आले आहेत. दिवसभरात नऊ बाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. आजच्या घडीला ५७ रुग्ण उपचार घेत असून यात चार बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ९० हजार १४७ एवढी झाली आहे. यातील ८७ हजार ४३१ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६५९ एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये नांदेड महापालिका (Nanded Municipal Corporation) - दोन, उमरी - दोन व मुखेड दोन असे एकूण सहा बाधित आढळले आहेत. जिल्ह्यातील नऊ कोरोना बाधितांना गुरूवारी औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी - एक, कंधार तालुक्यांतर्गत-एक, मुखेड कोविड रुग्णालय - दोन, महापालिका अंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरणातील - दोन व्यक्तीला रुग्णालयातून सुटी देण्यात आली.(nanded covid six cases reported glp 88)

हेही वाचा: लातुरात रिक्षावर झाड कोसळले अन् रिक्षाचालकाचा मृत्यू

नांदेड कोरोना मीटर

एकुण बाधित - ९० हजार १४७

एकूण बरे - ८७ हजार ४३१

एकुण मृत्यू - दोन हजार ६५९

गुरुवारी बाधित - सहा

गुरुवारी बरे - नऊ

गुरुवारी मृत्यू- शुन्य

उपचार सुरु- ५७

अतिगंभीर प्रकृती - चार

loading image