esakal | नांदेड : गोरक्षणातील गायींची चाऱ्यापासून उपासमार; चारा दान करण्याचे आवाहन

बोलून बातमी शोधा

cowshed

नांदेड : गोरक्षणातील गायींची चाऱ्यापासून उपासमार; चारा दान करण्याचे आवाहन

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : अर्पण, तर्पण आणि समर्पण भाव ठेवून गोसंवर्धनाचे काम गेल्या 25 वर्षापासून प. पू. जगदीश बाबांजी यांच्या खडकूत येथील गोशाळेत एक हजार 200 गायींच्या माध्यमातून गोसेवा करीत आहेत. परंतु गेल्या वर्षभरापासून शहरात कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने बंद असलेल्या परिस्थितीमुळे गोशाळेतील गायींना चार्‍यापासून वंचित रहावे लागत असल्याने लोकप्रतिनिधी, समाजसेवक व गोभक्तांनी गायींना चारा देण्याचे आवाहन प. पू. जगदीश बाबाजींनी केले आहे.

हिंदू धर्मात पुण्यकर्म समजल्या जाणार्‍या गोसेवेचा वसा घेतलेली खडकूत ही शाळा गोधनासाठी वरदान ठरत आहेत. गाय ही हिंदू समाजातील अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. गायींच्या रक्षणाची आणि संवर्धनाची जबाबदारी उचलण्याचे आणि त्यांची काळजी घेण्याचे महत्त्वाचे काम खडकूत येथील गोशाळेकडून गेल्या 25 वर्षापासून अविरत केले जात आहे.

हेही वाचा - उन्हाच्या कडाक्यामध्ये नांदेड जिल्हा परिषदेमधील पाणपोई झाली शोभेची वस्तू

गेल्या मार्च 2020 पासून कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच सुरु असल्याने या गायींचे अत्यंत वाईट परिस्थितीत रक्षण करत गायींच्या खाण्या- पिण्याची, औषधांची संपूर्ण काळजी जगदीश बाबाजी घेत आहेत. गोसेवेचे हे कार्य कोणतेही शासकीय अनुदान न घेता केवळ समाजसेवक व गोभक्तांच्या सहकाऱ्याने हे काम केले जाते.

हिंदू समाजात मृत पितरांना व कोरोनामुळे मृत पावलेल्या मृतात्म्यांना गायींना चार्‍या दिल्याने या पितरांना मोक्षप्राप्ती होते. समाजसेवक व गोभक्तांनी दररोजच्या जीवनात अर्पण, तर्पण आणि समर्पण या त्रिसूत्रींचा अवलंब करीत गोशाळेस चारा दान करण्याची गरज असल्याचे मत जगदीश बाबाजी यांनी व्यक्त केले.