Nanded : खडकूत येथील गोशाळेत गोबरगॅस प्रकल्पाचे भूमिपूजन

अशोक चव्हाण यांची उपस्थिती ः शेड उभारणीसाठी पाच लाख रुपयांचा निधी
Nanded
Nanded Sakal

नांदेड : खडकुत येथील गोशाळेत संत बाबा जगदीश महाराजांच्या मार्गदर्शनाखाली गोबर गॅस प्रकल्पाची सुरुवात हे चांगले काम असून या गोशाळेतून पुण्य वाटल्या जात असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

नांदेड शहरापासून जवळ असलेल्या खडकुत येथील गोशाळेत गोबर गॅस या प्रकल्पाच्या भुमिपुजन कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री आमदार अशोक चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. या वेळी व्यासपीठावर संतबाबा जगदीश महाराज, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार अमीताताई चव्हाण, आमदार अमरनाथ राजूरकर, ओमप्रकाश पोकर्णा, महापौर जयश्री पावडे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, भाऊराव कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके, खडकुतचे सरपंच दमयंती बुक्तरे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

पुढे बोलतांना अशोक चव्हाण म्हणाले की, गोशाळेचे काम बाबाजींच्या मार्गदर्शनाखाली योग्य चालत असून या गोशाळेत तब्बल ७०० गाई आहेत. गाईला आपण माता समजतो त्याचे योग्य संगोपन झाले पाहिजे. बाबाजी गाईंची सेवा करत आहेत. हे पुण्याचे काम आहे. गोबर गॅस या प्रकल्पाची मान्यता जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात आली असून त्यासाठी ५० लक्ष निधी उपलब्ध करून देण्यात आला. साधारण ४० किलो बायोगॅस, तीन हजार लिटर बायो फर्टीलायझर तयार करण्यात येणार असून शेणामुळे होणारी दुर्गंधी व प्रदुषण रोखल्यास मदत होणारच पण त्यासोबत शेणातील वाया जाणाऱ्या मिथेन गॅसचा वापरही करण्यात येणार आहे. शिवाय खडकूत येथील ८० घरांना त्याचा लाभ मिळणार आहे.

सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी केले. या वेळी ओमधूत, हरिश तिवारी, कैलास जोशी, बिरबल यादव, नरेश दंडवते, प्रदीप चाडावार, कैलास शर्मा, बंडू दायमा, मनोज लोहिया, ओम गिल्डा, दडू पुरोहित, राजेंद्र शुक्ला, खांडील गुरुजी, किशोर यादव, विजय पोकर्णा, आनंद जोशी, अरुण काबरा, गणेश जाजू, कचरु बजाज, राजू पारसेवार, घनशाम गुडगीला, संजय भंडारी, कैलास अग्रवाल, बजरंग शुक्ला आदींची यावेळी उपस्थिती होती. या वेळी भास्करराव पाटील खतगावकर यांनी गोशाळेचे काम पाहून तेथील शेड उभारणीसाठी पाच लाख रुपयाचा निधी जाहीर केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com