esakal | Nanded: ३४ लाखांचा गुटखा पकडला
sakal

बोलून बातमी शोधा

३४ लाखांचा गुटखा पकडला

नेकनूर : ३४ लाखांचा गुटखा पकडला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नेकनूर, ता. १३ (बातमीदार) : कर्नाटकातून बीडकडे दोन ट्रकमधून येत असलेला गुटखा पोलिसांनी बुधवारी (ता. १३) दुपारी मांजरसुंबा (ता. बीड) येथे पकडला. केजचे उपविभागीय पोलिस अधिकारी पंकज कुमार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून दोन ट्रकमध्ये गुटखा बीडकडे येत असल्याची माहिती पंकज कुमार यांना मिळाली. त्यांनी नेकनूर पोलिसांसह मांजरसुंबाजवळ हे दोन्ही ट्रक (के.ए. ५६ - ७१६७ आणि के.ए. ५६ - ९७११) ताब्यात घेतले. दहा चाकी ट्रकला ताडपत्री बांधून आतमध्ये गुटखा होता. दोन्ही ट्रकमध्ये ३४ लाख रुपयांचा गुटखा आढळला.

हेही वाचा: नांदेड : शेतात पिकले तेवढे वाहून गेले; एका रात्रीत झाले होत्याचे नव्हते

दोन्ही ट्रकसह तब्बल ६४ लाख रुपयांचा मुद्देमाल कारवाईत जप्त करण्यात आला. कारवाईत पंकजकुमार, नेकनूरचे साहाय्यक पोलिस निरीक्षक शेख मुस्तफा, दीपक खांडेकर, सय्यद अब्दुल, मनोहर अनवणे, श्री. राऊत यांनी सहभाग घेतला. या दोन्ही ट्रक व गुटखा नेकनूर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.

कोणाकडे जात होता माल?

जिल्ह्यात माफियाराजची जोरदार चर्चा असून यात गुटख्याची विक्रीही मोठी आहे. काही दिवसांपूर्वीच बीडजवळ एका गोदामात मोठा साठा पकडल्यानंतर आता चक्क दोन ट्रक भरून आलेला गुटखा पकडण्यात आला आहे. गुटखा जरी कर्नाटकातून आलेला असला तरी बीडमध्ये नेमका कोणाकडे तो जात होता, याच्या मुळाशी पोलिसांनी जाणे गरजेचे आहे. या व्यापारात काही व्हाईट कॉलर मंडळी देखील असल्याची चर्चा आहे.

loading image
go to top