जास्त मायलेज देणारी 'Bajaj Platina 100' खरेदी करा ४० हजारात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bajaj Platina 100
जास्त मायलेज देणारी 'Bajaj Platina 100' खरेदी करा ४० हजारात

जास्त मायलेज देणारी 'Bajaj Platina 100' खरेदी करा ४० हजारात

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : मोटारसायकल सेगमेंटमध्ये कमी किंमतीच्या जास्त मायलेज देणाऱ्या बाईक्सची मोठी रेंज उपलब्ध आहे. यात एक प्रमुख नाव म्हणजे बजाज प्लॅटिना. ती मायलेज आणि किंमत या दोन्हीसाठी ग्राहकांच्या पसंतीला उतरते. बजाज प्लॅटिना १०० (Bajaj Platina 100) शोरुममधून खरेदी केल्यास तुम्हाला ५२ हजार ९१५ रुपयांपासून ६३ हजार ५७८ रुपयांपर्यंत मोजावे लागतील. मात्र सुरुवातीची किंमत ऑन रोडवर आणखीन वाढते. जर तुमचे बजेट कमी आहे. मात्र तुम्हाला ही बाईक खरेदी करायची आहे. तर आम्ही तुम्हाला येथे ऑफरविषयी सांगणार आहोत ज्याने तुम्ही ही बाईक ४० हजार रुपयांमध्ये घरी घेऊन जाऊ शकता. तर चला जाणून घेऊ ऑफरविषयी...

हेही वाचा: Kia ची नवी कार, नवीन वर्षात होणार भारतात लाँच

बजाज प्लॅटिनावर ऑफर दिले आहे BIKES24 ने. तिने आपल्या साईटवर प्लॅटिनाला लिस्ट केले असून तिची किंमत ४० हजार ठेवली आहे. वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार या बाईकचे माॅडल २०१५ चे आहे. तिची ऑनरशीप फर्स्ट आहे. लिस्ट केलेल्या या बजाज प्लॅटिना आतापर्यंत ९ हजार किलोमीटर धावली आहे. ती हरियानाच्या एचआर-२६ आरटीओ ऑफिसमध्ये रजिस्टर्ड आहे. जर तुम्ही ही बाईक खरेदी केल्यास कंपनी काही अटींसह त्यावर एक वर्षांची वाॅरंटी आणि सात दिवसांची मनी बॅक गॅरंटी देत आहे. या मनी बॅक गॅरंटीनुसार, जर तुम्ही ही बाईक खरेदी केला आणि ती तुम्हाला आवडली नाही. त्यात काही बिघाड झाल्यास तुम्ही बाईक कंपनीला परत करु शकता. परत केल्यानंतर कंपनी विना काही कपात करता तुम्हाला तुमचे पैसे परत करेल.

हेही वाचा: BMW ने लाँच केली 220i ब्लॅक शॅडो कार, जाणून घ्या किंमत अन् फिचर्स

बजाज प्लॅटिनाचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन

बजाज प्लॅटिनामध्ये कंपनीने सिंगल सिलिंडरचे १०२ सीसीचे इंजिन दिले आहे. जे ७.९ पीएसचे पाॅवर आणि ८.३ एनएमचे पीक टाॅर्क जनरेट करते. या इंजिनबरोबर ४ स्पीड गिअरबाॅक्स दिले आहे. बाईकचे ब्रेकिंग सिस्टिमविषयी बोलाल तर तिचे फ्रंट व्हिलमध्ये डिस्क आणि रिअर व्हिलमध्ये ड्रम ब्रेक दिले आहे. त्याबरोबरच ट्युबलेस टायर दिले गेले आहे. मायलेज बाबत बजाजचा दावा आहे की बाईक ९० ते १०० किलोमीटरपर्यंत इतके लांब मायलेज देते.

loading image
go to top