Nanded Crime: दुचाकी चोरटे पुन्हा सुसाट, गुन्हे शोध पथकाचे दुर्लक्ष

दुचाकी सोबतच ट्रॅक्टर, चार चाकी वाहने तसेच मोठ्या वाहनांची देखील चोरी होत असल्याच्या घटना घडत आहेत.
Nanded Crime
Nanded CrimeSakal
Updated on

नांदेड - गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरटे पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. त्यामुळे दुचाकी चोरीच्या घटना वाढीस लागल्या आहेत.

दररोज दोन चार दुचाकी वाहने चोरीला जात असून याबाबत पोलिस ठाण्यात तक्रारी येत आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा पोलिस विभागाला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

Nanded Crime
Nanded News : दाजीची भाऊजीला धोबीपछाड,दहा जागा जिंकून बाजार समितीवर कब्जा

शिवाजीनगर भागातील कोठारी काॅम्प्लेक्स जवळ डॉ. प्रिया श्रीराम जहागीरदार (वय ४०, रा. सोमेश कॉलनी) यांनी त्यांची ५० हजाराची स्कूटी (एमएच २६ सीए ४८४६) उभी केली. त्यानंतर त्या कार्यालयात गेल्या असता चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलिस नायक शेळके करत आहेत. दुसऱ्या घटनेत राजनगर डेपोजवळ परमेश्वर गणेश पवार (वय २०, रा. बालाजीनगर) हा आनंदनगरमधील रसना वाईन मार्ट येथे ३५ हजाराची दुचाकी (एमएच २६ सीजी ४७६०) उभी केली आणि दारू आणण्यासाठी गेला असता चोरट्याने त्यांची दुचाकी चोरून नेली. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Nanded Crime
Nagar Crime: शाळकरी मुलीचा विनयभंग, पीडित मुलीने पोलिसांकडे तक्रार देताच आरोपी...

मेदनकल्लूरला ट्रॅक्टरची चोरी

दुचाकी सोबतच ट्रॅक्टर, चार चाकी वाहने तसेच मोठ्या वाहनांची देखील चोरी होत असल्याच्या घटना घडत आहेत.

मेदनकल्लूर (ता. देगलूर) येथील शेतकरी फेरोज इमामसाब शेख (वय ३७) यांचा चार लाख रुपयांचा ट्रॅक्टर (केए ३९ - टी ३०६६) गावामध्ये उभा केला असता चोरट्यांनी तो चोरून नेला. याबाबत देगलूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फौजदार मोरे करत आहेत.

Nanded Crime
Mumbai: महाराष्ट्र - गुजरात सीमा तपासणी नाक्यावर एसीबीची धाड, मोटार वाहन निरीक्षकाला खासगी सहकाऱ्यासह अटक

गुन्हे शोध पथकाचे दुर्लक्ष

प्रत्येक पोलिस ठाण्यात गुन्हे शोध पथक (डीबी) असते. त्यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचारी नियुक्त असतात. त्यांच्याकडे खबऱ्यामार्फत बरीच माहिती मिळू शकते. त्यामुळे त्या त्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी गेलेल्या वाहनांचा छडा लावणे शक्य आहे.

मध्यंतरी वजिराबाद पोलिस ठाण्यात दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते तसेच त्यांच्याकडील दुचाकीही जप्त करण्यात आल्या होत्या. लहान मुलेही दुचाकी चोरीमध्ये आढळत असून गुन्हेगारीही वाढत आहे. त्यामुळे पोलिस विभागाने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com