

Police arrest self-styled godman in Nanded following serious allegations of assault by a widow.
sakal
नांदेड: नाशिक जिल्ह्यातील भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरण राज्यभर गाजत असताना नांदेडमध्येही तत्सम धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ४३ वर्षीय विधवेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी भोंदूबाबा हरीगिर दत्तगिर गिरी (वय ३९) याला भाग्यनगर पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित महिलेने शनिवारी (ता. २१) रात्री तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्याला लगेचच ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे.