esakal | नांदेडने ओलांडला पाचशेचा आकडा; दिवसभरात १८ रुग्णांची भर
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

बुधवारी दिवसभरात १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ५११ इतकी झाली आहे. उपचारादरम्यान मृत्यू संख्या २३ वर पोहचली आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत ३४१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. १४७ बाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे डॉ. भोसीकर यांनी सांगितले. 

नांदेडने ओलांडला पाचशेचा आकडा; दिवसभरात १८ रुग्णांची भर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : बुधवारी (ता. आठ) सकाळी दोन टप्यात व त्यानंतर सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान २७६ अहवाल प्राप्त झाले. यातील दिवसभरात मिळुन १८ स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.

मंगळवारी (ता. सात) प्रयोगशाळेकडून दिवसभरात १०२ स्वॅब अहवाल प्राप्त झाले होते. यात जिल्ह्यातील आत्तापर्यंत सर्वात जास्त २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यामध्ये कॉँग्रेसचे उपमहापौर यांचादेखील समावेश आहे. तर बुधवारी दिवसभरात १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ५११ इतकी झाली आहे. उपचारादरम्यान मृत्यू संख्या २३ वर पोहचली आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत ३४१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. १४७ बाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे डॉ. भोसीकर यांनी सांगितले. 

हेही वाचा- विहिरीत टाकले ब्लिचिंग पावडर; पुढे काय झाले वाचा

या भागात सापडले रुग्ण 

बुधवारी सापडलेल्या रुग्णांमध्ये विकासनगर कंधार येथील (वय ७२) व (वय ३९) दोन पुरुष, काटकळंबा (वय २४) पुरुष, दत्तात्रेनगर मुखेड येथील (वय ५२) एक पुरुष व (वय ३५) आणि ३८ वर्ष वयाच्या दोन महिला, सिडको नांदेड (वय ३६) पुरुष, सावित्रीबाई फुले नगर (वय ३८) पुरुष, तागलेनगल्ली मुखेड (वय ३४) पुरुष, (वय २१) महिला व (दहा) वर्षाची मुलगी तसेच दापका येथील एका (दहा) वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. मुखेड पोलिस कॉलनी येथील (वय ३०) पुरुष, शिवाजीनगर मुखेड (वय १७) पुरुष, उत्तमनिवास जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील (वय ३६) स्त्री, कंधार तालुक्यातील परंडा (वय २३) स्त्री, (वय४७) पुरुष, हस्सापूर येथील एक बालक (वय सहा) वर्ष, (वय ५०) स्त्री, (दोन) वर्षाची मुलगी, उमर कॉलनी येथील दोन पुरुष (वय ३४), (वय ६१)वर्ष, बालक (वय चार), बालाजीनगरातील तीन पुरुष (वय २५), (वय ३०), (वय ५८) व दोन बालक, दोन महिला (वय ३४) व (वय ५५), सिडको (वय ३६),  सावित्रीबाई फुलेनगर (वय ३८) पुरुष, पीरबुऱ्हाणनगर (वय १८) स्त्री,  देगलुरनाका (वय ४२) स्त्री,  हादगाव तालुक्यातील  पळसा (वय २५),  देगलुर (वय ४६), पुरुष, परभणी जिल्ह्यातील वस्सा (वय ७०) पुरुष तर, गांधीनगर बिलोली (वय ३२) व किनवट तालुक्यातील गोकुंदा येथील (वय १८) आणि (वय २०), मुक्रामाबाद (वय ४०), (वय ६०), (वय ३१) तीन स्त्रीया, दोन मुली (सात) वर्ष, बोमनाळ गल्ली नायगाव (वय ३८), (वय ४०), व एक बालक (वय सहा) वर्ष, आंबेडकरनगर (वय ५२), आंबेडकरनगर (वय २८), देगलुरनाका (वय ६०),  विजयनगर (वय ७५), गणेशनगर (वय २१) पुरुष, एक (वय ४७) स्त्री या रुग्णांचा समावेश आहे.  

कंधार तालुक्यातील उमरज सोमनाळा तांडा येथील ६५ वर्षीय महिला डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात २९ जून रोजी उपचारासाठी दाखल झाली होती. दुसऱ्या दिवशी ती पॉझिटिव्ह असल्याचे सिद्ध झाल्यानंतर तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी मध्यरात्री या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हेही वाचलेच पाहिजे - कोरोनाचा सामना : नांदेडात आता मिशन ब्रेक द चेन

राजकीय पुढाऱ्यांच्या संपर्कातील कार्यकर्ताना धसकी

नांदेड जिल्ह्यात रोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे जिल्हा प्रशासनाने देखील लॉकडाउनच्या नियमात काही अंशी बदल केला असून, पुढील काळात नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी योग्य ती काळजी न घेतल्यास पुन्हा नियमावली कडक करण्याचे संकेत दिले आहेत. मागील तीन दिवसात ६० पेक्षा अधिक रुग्णांची भर पडली असून, यामध्ये ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या मोठी आहे. दुसरीकडे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. राजकीय पुढाऱ्यांमध्ये सुद्धा कोरोनाची लागण होत असल्याने त्यांच्या संपर्कातील अनेकांनी कोरोनाची धास्ती घेतली आहे.