
नांदेड : विक्रमी वेळेत ३०० किलोमीटरची सायकलिंग
नांदेड : नांदेड पोलीस विभागाचे पोलीस नाईक संतोष सोनसळे व त्यांचे मित्र हेमंत बेले यांच्या साथीने नांदेड निजामाबाद व परत नांदेड अशी ३०० किलोमीटर अंतर सायकलिंग केली आहे. यादरम्यान त्यांनी विक्रमी वेळेत अयोडेक्स इंडियाच्या प्रदूषण जनजागृतीचा संदेश दिला.
हेही वाचा: 'अंजनी' नदीपात्रातून निघाला तीन ट्रॉली कचरा
सायकलिंगमध्ये राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत नावलौकिक असणारे पोलिस विभागाचे क्रीडाप्रमुख संतोष सोनसळे व त्यांचे मित्र हेमंत बेले यांनी नांदेड क्लब येथून ३०० किलोमीटर अंतराची सायकलिंगची सुरवात केली. नरसी नायगाव, बिलोली, बोधन, निजामाबाद व डिचपल्लीपर्यंत दीडशे किलोमीटर जाणे व येणे अंतर यशस्वीरित्या पूर्ण केले. २० तासात अंतर पूर्ण करण्याची मुभा असतांना १८ तासात ३०० किलोमीटर अंतर या दोघांनी पूर्ण केले व पोलिस दलाचे नाव लौकिक केले.
हेही वाचा: अहमदनगर : एसटीचे १६५ कर्मचारी बडतर्फ
संतोष व हेमंत यांच्या या घवघवीत यशाबद्धल नांदेड परीक्षेत्राचे पोलिस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, निलेश मोरे, पोलिस उप अधीक्षक (गृह) अर्चना पाटील, राखीव पोलिस निरिक्षक विजय धोंडगे आदींनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Web Title: Nanded Cycling 300 Km In Record Time Message Of Pollution Awareness
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..