नांदेड : प्रशासनाचे उदासीन धोरण त्रासदायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Dagdasangvi Dam road Repair

नांदेड : प्रशासनाचे उदासीन धोरण त्रासदायक

कंधार - चार दिवसांपूर्वी सर्वदूर पाऊस बरसला. संततधार पावसाने शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. पुलावरून पुराचे पाणी वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. पुराच्या पाण्यामुळे दगडसांगवी (ता.लोहा) येथील बंधाऱ्याला जोडणारा रस्ता वाहून गेल्याने या गावाचा सुद्धा संपर्क तुटला होता. पाऊस थांबल्यानंतर ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन श्रमदानातून रस्त्याची दुरुस्ती करण्याचे काम सुरू केले. दगडसांगवी येथील बंधाऱ्याला जोडणारा रस्ता पावसाळ्यात नेहमी वाहून जातो. प्रशासनाच्या उदासीन घोरणामुळे या गावातील लोकांना पावसाळ्यात प्रचंड त्रास सोसावा लागतो हे विशेष होय.

कंधार तालुक्याच्या सिमेवर दगडसांगवी हे गाव आहे. हे गाव विकासापासून कोसो दूर आहे. चुकीच्या भौगोलिक सर्वेमध्ये हे गाव लोहा तालुक्यात समाविष्ठ करण्यात आले. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात या गावचा संपर्क तुटतो. यावर्षी सुद्धा बंधाऱ्याला जोडणाऱ्या रस्त्याची घसरण झाली. बंधाऱ्याला जोडणारा रस्त्याचा भाग मजबूत करावा असे आज पर्यंत लोकप्रतिनिधींना व प्रशासनाला वाटले नाही. गावातील तरुणांकडून या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. गावकऱ्यांकडून प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याबाबतीत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

गावातील सरपंच संतराम ढवळे व उपसरपंच श्रीधर फाजगे यांनी आमदार, तहसीलदार, पाटबंधारे विभागाचे अभियंता यांना संपर्क करुन माहिती दिली. परंतू कोणीच लक्ष दिले नाही. त्यामुळे दगडसांगवी गावातील जनता त्रस्त झाली आहे. तत्कालीन आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्या काळात नदीवर बांधलेला बंधाराच या गावाच्या संपर्काचे काम करत आहे. परंतू दरवर्षी अतिरिक्त पाणी प्रवाहामुळे या बंधाऱ्याचे कठडे व दोन्ही बाजू वाहून जातात. यावर्षीही अशीच परिस्थिती झाली असून गावातील कल्याण फाजगे, संतोष फाजगे, रोहिदास फाजगे, धनराज तोरणे, ज्ञानेश्वर फाजगे, सुधाकर फाजगे, संग्राम तोरणे, कैलास आडकुटे या तरुणांकडून बंधाऱ्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली. परंतू लोकप्रतिनिधी व प्रशासन याकडे का दुर्लक्ष करत आहेत ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Web Title: Nanded Dagdasangvi Dam Rain Flood Water Damaged Road Repair

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..