esakal | नांदेड : कर्जबाजारी शेतकऱ्याने गोदावरीत उडी घेऊन केली आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कुंटुर पोलिसांच्या माहितीवरुन त्यांच्या हद्दीतील दुगाव (ता. नायगाव) येथील दिगंबर तुळशीराम पुयड (वय ४५) यांच्या शेतात मागील काही वर्षापासून सतत नापीकी होत होती. यामुळे ते कर्जबाजारी झाले.

नांदेड : कर्जबाजारी शेतकऱ्याने गोदावरीत उडी घेऊन केली आत्महत्या

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : सततची नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने गोदावरी नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना राहेर (ता. नायगाव) शिवारात ता. चार नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी कुंटुर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

कुंटुर पोलिसांच्या माहितीवरुन त्यांच्या हद्दीतील दुगाव (ता. नायगाव) येथील दिगंबर तुळशीराम पुयड (वय ४५) यांच्या शेतात मागील काही वर्षापासून सतत नापीकी होत होती. यामुळे ते कर्जबाजारी झाले. त्यांनी एका फायनान्सचे कर्ज काढले. शेतातील उत्पन्न घटल्याने कर्जाचा बोजा वाढत गेला. त्यामुळे तो घरातून ता. दोन नोव्हेंबरच्या दुपारी चारच्या सुमारास घरातून निघून गेल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकानी दिली. यावरुन पोलिसांनी नोंद घेऊन शोध सुरु केला. शेवटी राहेर शिवारातील गोदावरी नदी पात्रात दिगंबर पुयड याचा मृतदेह सापडला. पोलिसांनी नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. उत्तरीय तपासणीनंतर सदरचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. या प्रकरणाची माहिती शकुंतला दिगंबर पुयड यांनी कुंटुर पोलिस ठाण्यात दिली. यावरुन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक करीम पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार श्री. येवले करत आहेत. 

हेही वाचा स्वारातीम विद्यापीठातर्फे निबंध स्पर्धा -

जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची तर जिल्हा उपाध्यक्षपदी महेश पाटील 

नांदेड- अखिल भारतीय प्रहार संघटनेच्या विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील ढगे यांची तर जिल्हा उपाध्यक्षपदी महेश पाटील रुईकर यांची निवड करण्यात आली. यावेळी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजी श्यामराव पावडे, गणेश कल्याणकर, सतीश चव्हाण, ऋषिकेश पावडे, प्रेम कल्याणकर यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली. यावेळी अभिजीत गोणगोपले, बालाजी ढगे, विठ्ठल नरवाडे, तेजस चिरमाडे, आकाश चव्हाण, कृष्णा जाधव, माधव मिसाळे, ओम वागदकर आदींची उपस्थिती होती.