नांदेड - दिल्ली, मुंबई, पुणे विमानसेवा लवकरच सुरू होणार; ज्योतिरादित्य शिंदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Delhi Mumbai Pune flights services start soon

नांदेड - दिल्ली, मुंबई, पुणे विमानसेवा लवकरच सुरू होणार; ज्योतिरादित्य शिंदे

नांदेड - नांदेड येथून नांदेड - मुंबई, नांदेड - दिल्ली आणि नांदेड - पुणे ही विमानसेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादीत्य शिंदे यांच्याकडे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह खासदारांच्या शिष्टमंडळाने केली होती. या विमानसेवा लवकरच सुरू करण्यात येतील, अशी ग्वाही केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली आहे.

शीख धर्मियांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचखंड गुरुद्वारा येथे येणाऱ्या भाविक भक्तांची संख्या ही दिवसेंदिवस वाढते आहे. शिवाय जगातील कानाकोपऱ्यातून हुजूर साहेब सचखंड दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे नांदेडला राष्ट्रीय पातळीवर जोडण्यासाठी ही विमान सेवा अत्यावश्यक ठरणारी आहे.

नांदेड - पुणे, नांदेड - दिल्ली आणि नांदेड - मुंबई या तिन्ही मार्गावर नवीन विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी नांदेडचे खासदार चिखलीकर, बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, जहीराबादचे खासदार भीमराव पाटील, मनमाडचे खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेऊन केली होती.

नांदेड शहराचा वाढता विस्तार आणि उद्योग व्यवसायाच्या नवीन वाढीसाठीही विमानसेवा अत्यावश्यक ठरणारी आहे. खासदार चिखलीकर यांच्या प्रयत्नामुळे नांदेडला आणि मराठवाड्याला अनेक रेल्वे सेवांचा लाभ मिळाला आहे. आता विमानसेवा अधिकाधिक दर्जेदार व्हावी, आणि नांदेडकरांना मुंबई, पुणे, दिल्ली येथे तातडीने पोहोचता यावे, या अनुषंगाने या विमानसेवा प्राधान्याने सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीच्या अनुषंगाने केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी विमानसेवा सुरू करण्याच्या अनुषंगाने सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास दिला असल्याची माहिती खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली आहे.

Web Title: Nanded Delhi Mumbai Pune Flights Services Start Soon Jyotiraditya Shinde

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..