Nanded Updates : जिल्ह्यातील २९ जणांना डेंग्यूची लागण

Nanded Updates : जिल्ह्यातील २९ जणांना डेंग्यूची लागण
Updated on

नांदेड : जिल्ह्यातील कोरोनाची (Corona) परिस्थिती आटोक्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची काहीशी चिंता मिटली असली तरी, पावसाळ्यात पाण्याचे डपके साचून त्यात ‘ईडीस’डासांची निर्मिती होते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात डेंग्यु रुग्णांची संख्या (Dengue) वाढलेली दिसते. जानेवारी ते जूलै २०२१ दरम्यान जिल्हा (Nanded) हिवताप कार्यालय व महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने १२५ रक्तजल तपासणी करण्यात आली होती. यामध्ये २९ जणांना डेंग्यु आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आलेली ही अकडेवारी कोरोनानंतर आरोग्य विभागाची चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी देखील कुठल्याही साथीच्या रोगास हलक्यात न घेण्याच्या जिल्हा आरोग्य विभाग व जिल्हा हिवताप कार्यालयास सक्त सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे डेंग्यूमुक्त नांदेड जिल्ह्यासाठी प्रत्येक शनिवार डेंग्यूच्या काळजीसाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे.

Nanded Updates : जिल्ह्यातील २९ जणांना डेंग्यूची लागण
बँक मॅनेजरला मारहाण, नंतर अधिकाऱ्यावरच विनयभंगाचा गुन्हा दाखल

मागील वर्षी कोरोनाची रुग्ण अधिक प्रमाणात वाढली होती. त्यामुळे शहर व ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांना संशयित व्यक्तींचे पाहिजे त्या प्रमाणात रक्तजल तपासणी करता आली नव्हती. जुलै २०२० अखेर केवळ १३ जणांचे रक्तजल नमुने घेतली गेली होती. यात एकही दुषित रुग्ण आढळुन आला नव्हता. यंदा कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होताच जिल्हा हिवताप कार्यालयाचे आरोग्य कर्मचारी, महापालिकेतील आरोग्य कर्मचारी रक्तजल नमुने तपासणी, चिकनगुणिया व मलेरिया रुग्ण तपासणीच्या कामाला लागली आहेत. जानेवारी ते जुलै २०२१ दरम्यान हिवताप तपासण्यासाठी एक लाख ४६ हजार ८६७ रक्तजल तपासण्यासाठी घेण्यात आली. परंतु यात एकही मलेरियाचा रुग्ण आढळला नाही. शिवाय चिकनगुनिया तपासणीसाठी घेण्यात आलेल्यापैकी एकही रुग्ण आढळुन आला नाही.

Nanded Updates : जिल्ह्यातील २९ जणांना डेंग्यूची लागण
'केवळ प्रसिद्धीसाठी बायोपिक करणं विद्याला मान्य नाही'

अशी आहे तालुकानिहाय डेंग्यु रुग्णसंख्या

- हदगाव- एक

- भोकर- दोन

- नांदेड-पाच

- मुखेड-एक

- लोहा-दोन

- कंधार- चार

- नायगाव-एक

- बिलोली-एक

- देगलूर-एक

- महापालीका-११

- एकुण- २९

Nanded Updates : जिल्ह्यातील २९ जणांना डेंग्यूची लागण
जनते पुढे राजकारणी हारले! आंचल गोयल या जिल्हाधिकारीपदी रुजू

जिल्हा हिवताप कार्यालयाचे आरोग्य कर्मचारी गावा गावात जाऊन साथीच्या रोगा बद्दल जनजागृती करत आहेत. त्या शिवाय साठलेल्या पाण्याच्या डपक्यात गप्पे मासे देखील सोडण्यात येत आहेत. नागरीकांनी देखील पावसाळ्यत घरात जास्त पाण्याचे साठवण करुन ठेवू नये, घरातील व शेजारी असलेल्या व्यक्तीचा आजारापणा बद्दल माहिती द्यावी. त्यामुळे कुठलाही साथीचा आजाराचा फौलाव होणार नाही व साथ रोग लवकर नियंत्रणात येईण्यात मदत होईल.

- डॉ. आकाश देशमुख, जिल्हा हिवताप अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nanded
Turning Grief into Determination: Abhimanyu Cracks MPSC Revenue Assistant Exam
Police Raid Grocery Store, Trace Larger Gutkha Stock Worth Lakhs in Nanded City
Mother’s hard work and son's determination lead to PSI success
Marathi News Esakal
www.esakal.com