esakal | नांदेड : तेंदुपत्ता खरेदी बंद झाल्याने दुर्गम भागातील रोजगार वंचित

बोलून बातमी शोधा

तेंदू पानापासून बिडी

नांदेड : तेंदुपत्ता खरेदी बंद झाल्याने दुर्गम भागातील रोजगार वंचित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिवणी (ता. किनवट, जि. नांदेड) : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुका हा वन संपदेने नटलेला तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल ( Forest department)असल्याने या जंगलापासून दुर्गम भागातील जनतेला दरवर्षी रोजगार मिळत असतो. या रोजगारातून शेतकरी, शेतमजूर आपली वर्षाचे बजेट बसवत असतो. मात्र काही वर्षापूर्वी वन विभागाकडून तेंदूपत्त्याची खरेदी होत होती. पण गेल्या आठ- दहा वर्षांपासून या भागातील वन विभागाने खरेदी बंद केली. Nanded: Deprivation of employment in remote areas due to non-purchase of tendu leaves

त्या अगोदर तेंदु पत्त्याची लिलावाच्या माध्यमातून खरेदी होत होती. या भागातील लिलावाची प्रक्रिया थंड बस्त्यात पडल्याने या भागातील जनतेला मिळणारा रोजगारापासून वंचित राहू लागला आहे. या तेंदुपत्त्यावर शेतकरी (Farmer do sows in field)आपल्या खरिपाच्या पेरणीची तयारी करीत असत. या खरीप हंगामापूर्वी उन्हाळ्यात तेंदूपत्ता संकलनातून चांगली मिळकत होत होती. तेंदूपत्ता यापासून मिळालेल्या पैशातून मजुर आपले वर्षाचे नियोजन करत असत, तर शेतकरी या मिळकतीतून शेतीसाठी लागणारे बियाणे- खते- औषधी लागणारी मजुरी या पैशातून करीत असत.

दुसऱ्या राज्यातील कंत्राटदार तेंदूपत्ता खरेदीसाठी पसंती देत लिलावात सहभागी होत

या तालुक्यातील जंगलातून उच्च दर्जाचे व मोठ्या प्रमाणात तेंदूपत्ता प्राप्त होतो. यामुळे दुसऱ्या राज्यातील कंत्राटदार तेंदूपत्ता खरेदीसाठी पसंती देत लिलावात सहभागी होत असत. तेंदूपत्ता संकलन यापासून या भागात एक महिनाभर रोजगार प्राप्त होत होता. तेंदूपत्ता जंगलातुन आणन्यासाठी महिलांना दोन- तीन किलोमीटरचा प्रवास करुन जंगलातील पालव्याचे पाणे तोडुन लांब अंतरावरुन डोक्यावर वाहून आणावे लागत होते. घरी आणल्यावर दिवसभर परिवारातील सर्व जण मिळून शंभर पानाचा एक कट्टा जमा करुन त्याला दोरीने बांधून तयार करावे लागते.

हेही वाचा - कोरोना निर्मूलनासाठी हदगांवच्या आमदार जवळगांवकरांचा पुढाकार

या भागातील रोजगारापासून वंचित राहावे लागत असल्याने

शिवणी व परीसरातील काही गावातील महिला बिडी तयार करण्याचे कामे करीत असतात. तेंलगणातील बिडी कंपनीवाले यागावात येऊन बिड्या खरेदी करत असतात. त्या महिलाना बिडी करण्यासाठीचा तेंदुपत्ता व तंबाखू त्या कंपनीवाल्यांकडुन मिळत असतो. त्यामुळे बिडी बनवतेवेळेस जर तेंदुपत्ता कमी पडला तर ते खरेदी करुन बिडी बनवत असतात. त्यामुळे या भागातील महिलांना दिवसाकाठी दोनशे ते अडीचशे रुपये मजुरी मिळते. पण बऱ्याच महिलांना बिडी बनवता येत नसल्याने त्या महिला तेंदुपत्त्याच्या संकलनातुन रोजगार मिळवत असतात. त्यामुळे या भागातील रोजगारापासून वंचित राहावे लागत असल्याने या भागातील नागरिक वनविभागाकडुन खरेदी केंद्र चालू करावी अशी मागणी होत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

https://www.youtube.com/watch?v=eTfPn1xHlkI