esakal | कोरोना निर्मूलनासाठी हदगांवच्या आमदार जवळगांवकरांचा पुढाकार

बोलून बातमी शोधा

आमदार माधवराव पाटील
कोरोना निर्मूलनासाठी हदगांवच्या आमदार जवळगांवकरांचा पुढाकार
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : हदगांवचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर (Mla Madhavrao javalgaonkar) यांनी आपल्या निधीतून सहा रुग्णवाहिका (Ambulance) मतदारसंघाच्या रुग्ण सेवेला दिल्या आहेत. मतदारसंघातील मध्यवर्ती ठिकाण (Center Point)असलेल्या तामसा इथल्या आरोग्य केंद्रात हा लोकार्पण सोहळा पार पडला. (Hadgaon MLA Jawalgaonkar's initiative for eradication of corona)

रुग्णवाहिकेसोबत आमदार पाटील यांनी हदगांव आणि हिमायतनगर इथे ऑक्सीजन प्लॅन्टच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यातून कोरोना रुग्णांवर तालुक्यातच यशस्वी उपचार होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर तालुक्यात जनता कर्फ्युचा प्रयोग यशस्वी झाल्याने कोरोना आटोक्यात आल्याचा दावा देखील आमदार जवळगांवकर यांनी केला आहे. दरम्यान, आपला बहुतांश आमदार निधी आरोग्य सेवेसाठी दिल्याने हदगांवच्या आमदारांचे मतदारसंघात कौतुक होत आहे. विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यात आपला सर्वाधिक निधी आरोग्यासाठी देणारे आमदार म्हणून जवळगांवकर यांनी अग्रक्रम मिळवला आहे.

हेही वाचा - शस्त्र आपल्या शरीराचे संरक्षण करु शकतील पण मनाचं संरक्षण करु शकत नाहीत. शस्त्राने आत्मबल देतील असे सांगता येत नाही. सकारात्मक विचार, संयम, सहनशीलता, सकारात्मक भावनाच मनाला उभारी आणि आत्मबळ देतात.

आमदार माधवराव जवळगावकर हे नेहमीच सामाजीक व धार्मीक कार्यक्रमात सहभागी होऊन मदतीसाठी सक्रीय असतात. त्यांच्या मतदार संघात हिमायतनगर व हदगांव हे मोठे दोन तालुके आहेत. या मतदार संघातील सर्वसामान्यांच्या सुख- दु : खात आमदार जवळगावकर नेहमीच पुढाकार घेऊन त्यांना मदत करतात. अनेक गरीबांना ते आर्थीक मदत करुन त्यांना नवी उमेद देतात. कोरोनाच्या काळातही ते सतत फिरुन आपल्या मतदार संघातील नागरिकांना आरोग्य सेवेसोबतच अन्य काही अडचणी येऊ नये यासाठी प्रयत्न करतात. आमदार निधीतून ते विविध विकास कामे करुन या मतदार संघाचा कायापालट करण्याचा प्रयत्न करत आहेत.