नांदेड : घरातील व्यक्ती आजारी असल्यामुळे दिवाळी साजरी न करू शकणाऱ्या नातेवाईकांना दिवाळीचे चार दिवस मिष्टान्न भोजन 

प्रल्हाद कांबळे
Sunday, 15 November 2020

दिवाळीचे चार दिवस दररोज मिष्टान्न भोजन असलेला लॉयन्सचा डबा वाटप करून लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रलने  अभिनव पद्धतीने दिवाळी साजरी केली.

नांदेड : ज्या घरातील व्यक्ती आजारी असून तो रुग्णालयात उपचार घेत असले तर त्याच्या घरच्याना दिवाली मिळत नाीह. अशा नातेवाईक व रुग्णांना चार दिवस दिवाळी फराळ व मिष्ठाण भोजन देऊन सामाजीक दायीत्व जपले. लाॅयन्स डबा, रयत आणि गुरूजी रुग्णालयाने पुढाकार घेतला होता.

रयत रुग्णालय व श्री गुरुजी रुग्णालय येथे गेल्या दोन वर्षापासून लॉयन्सचा डबा हा उपक्रम सुरू आहे. श्री गुरुजी रुग्णालयात तर आगामी दोन वर्षाची आगाऊ नोंदणी अन्नदात्यांनी केली आहे. कोलकता येथील प्रमोदसिंह यांच्यावतीने रुग्णांच्या नातेवाईकांना तसेच रस्त्यावरील निराधारांना दिवाळीचा फराळ धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर अर्णवसिंह राजपूत, नरेंद्र पटवारी, मन्मथ स्वामी, राजेशसिंह ठाकूर यांनी वाटप केला.सणांचा राजा असलेल्या दिवाळीचे चार दिवस दररोज वेगवेगळे मिष्ठान्न लॉयन्सच्या डब्यात देण्यात आले. पहिल्या दिवशी पूर्वा शोभित जैस्वाल यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच डॉ. व्ही. एम. सहस्त्रबुद्धे यांच्यातर्फे पुरणपोळी देण्यात आली. 

हेही वाचा नांदेड : गावठी कट्टा आणि एअरगण पिस्टल वापरणारा आरोपी पोलिस कोठडीत -

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम व दिलीप ठाकूर यांच्यातर्फे बेसन चक्की डब्यात देण्यात आली. बुंदीचे लाडूसह जेवण तिसऱ्या दिवशी कै. सुभानजी संभाजी गंगासागरे उमरी यांच्या स्मरणार्थ तसेच मामोडे परिवारातील पूर्वजांच्या स्मरणार्थ नंदलाल गोकुळजी मामोडे यांच्यातर्फे  वाटप करण्यात आले.भाऊबीज व पाडव्याचे औचित्य साधून कै. सत्यनारायणजी भारतीया तसेच कै. चंद्रभानलाल जयकिशनलाल अग्रवाल तामसा यांच्या स्मरणार्थ शिरा पुरी व मसाला भात डब्यात देण्यात येणार आहे. रयत रुग्णालयात तिसऱ्या वर्षासाठी एक जानेवारी पासून नवीन नोंदणी करण्यात येत आहे. लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल च्या वतीने  मायेची ऊब हा  रस्त्यावर कुडकुडत झोपलेल्या निराधारांना ब्लॅंकेट वाटपाचा नवीन उपक्रम  सुरू करण्यात आला असून दानशूर नागरिकांनी  याही उपक्रमाला भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन लॉयन्स प्रथम उपप्रांतपाल लॉ. दिलीप मोदी,अध्यक्ष लॉ. संजय अग्रवाल, झोनल चेअरमन लॉ. डॉ. विजय भारतीया व लॉ.योगेश जैस्वाल,सचिव लॉ. ॲड. उमेश मेगदे, कोषाध्यक्ष लॉ. सुनील साबू, व प्रोजेक्ट चेअरमन धर्मभूषण लॉ. ॲड. दिलीप ठाकूर यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NANDED: Desserts are served daily for four days to relatives who are unable to celebrate Diwali due to illness at home nanded news