Nanded District Bank
Nanded District BankSakal

नांदेड : जिल्हा बँक चिंताजनक परिस्थितीतून बाहेर

वसंतराव चव्हाण; वर्षभरात १२ कोटींचा निव्वळ नफा

नांदेड - इतर बँकांच्या बाबतीत चढ उतार येत असतात. त्याप्रमाणेच नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेला देखील अनेक चढ उतार बघावे लागले आहेत. एक वेळ अशीही आली होती बँक दिवाळखोरीत निघेल असे वाटत होते. परंतू मागील वर्षभराच्या काळात जिल्हा बँक चिंताजनक परिस्थितीतून पूर्णपणे बाहेर पडली असल्याची माहिती नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनी गुरूवारी (ता. २८) पत्रकार परिषदेत दिली. सध्या बँकींग क्षेत्रात स्पर्धेचे युग असून बँकींग व्यवसायात अमुलाग्र बदल झाले आहेत. बदलत्या परिस्थितीनुसार बॅंकेने कोअर बँकींग प्रणाली, आरटीजीएस, एनईएफटीची, एसएमएस अलर्टची सुविधा, रुपे केसीसी व रुपे डेबिट कार्डची सुविधा व ग्राहकांच्या खात्यामध्ये थेट रक्कमा जमा करण्याची सुविधा (डीबीटी) जिल्ह्यातील सर्व शाखांमधुन ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे.

बँक आस्थापनेवरील अपुरी कर्मचारी संख्या व बँकेकडून करण्यात येत असलेल्या ज्याचा वापर विचारात घेवून जिल्ह्यातील सर्व शेतकरी सभासद व ग्राहकांना सदर प्रसंगी आवर्जून सांगावेसे वाटते की, जिल्हा बँकेकडून आजपर्यंत जिल्ह्यातील शेतकरी सभासदांना ७२ हजार केसीसी कार्ड व एक लाख ८० हजार एटीएम कार्डचे वाटप करण्यात आले आहे. नजीकच्या काळात दोन लाख एटीएम कार्ड वाटप करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील १६ तालुक्याच्या ठिकाणी बँकेचे एटीएम मशिन बसविण्यात येणार आहेत. बँक आस्थापनेवर अपुरी कर्मचारी संख्या असतांना व कोरोना सारख्या रोगाची साथ चालू असताना जिल्ह्यातील शेतकरी व ग्राहकांना उत्कृष्ट सेवा दिली आहे. बँकेने खरीप हंगाम २०२० मध्ये एकूण २७८ कोटी रुपये कर्ज वाटप केले होते. त्या तुलनेत खरीप २०२१ साठी ३१५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. जे की दिलेल्या उद्दिष्टाच्या १२५ टक्के एवढे असल्याचे श्री. चव्हाण म्हणाले. या प्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कदम यांच्यासह अनेक सभासद उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com