nanded district bank election
sakal
अर्धापूर - नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत मतदार यादी तयार करण्याचा पहिला टप्पा जिल्हात पुर्ण झाला आहे. आर्धापूर तालुक्यातील सेवा सहकारी सोसायटी, विविध सेवा सहकारी सोसायटी, कारखाना, मजुर संस्था आदिंचे ठराव पारित करुन मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. अर्धापूर तालुक्यात या बॅंकेच्या निवडणूकीत ४३ मतदार असणार आहेत.