Nanded News : नांदेडलाही द्यावे झुकते माप... अनेक मागण्या प्रलंबित; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही पडतो विसर...

मंत्रिमंडळाकडून अपेक्षा : अनेक मागण्या अजूनही प्रलंबित असून त्याकडे मंत्रीमंडळाने लक्ष देऊन त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा
Nanded district development bjp shiv sena ncp cm eknath shinde fadnavis ajit pawar politics
Nanded district development bjp shiv sena ncp cm eknath shinde fadnavis ajit pawar politicsnanded

नांदेड : महाराष्ट्रात मराठवाड्यातील एका शेवटच्या टोकावर आणि तेलंगणा व कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या नांदेड जिल्हा आजही विकासाच्या प्रतिक्षेत आहे. अनेक मागण्या अजूनही प्रलंबित असून त्याकडे मंत्रीमंडळाने लक्ष देऊन त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

विशेष म्हणजे नांदेडच्या बाबतीत नेहमीच सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही विसर पडतो, हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळातही नांदेडला फारसे काही मिळाले नाही आता भाजप - शिवसेना - राष्ट्रवादीच्या सरकारकडून काही मिळणार का? याकडे नांदेडकरांचे लक्ष लागले आहे.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मंत्रीमंडळाची बैठक शनिवारी (ता. १६) होत आहे.

त्यानिमित्त नांदेड जिल्ह्याला काय मिळणार? याकडे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते आले होते तसेच ते पालकमंत्रीही होते. आता युती सरकारच्या काळात पालकमंत्री गिरीश महाजन झाले आहेत. नांदेडच्या विकासाच्या आणि मागण्याबाबत नेहमीच चर्चा होते. मात्र, मंजुरी आणि अंमलबजावणीसाठी वेळ लागतो.

या मागण्यांवर व्हावा विचार

  • तेलंगणा सीमा भागातील विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात यावे. त्यासाठी विशेष पॅकेज घोषित करून निधी उपलब्ध करून द्यावा.

  • जिल्ह्यासाठी कृषी महाविद्यालयास मंजुरी द्यावी.

  • शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रसशाळा असून या ठिकाणी आयुर्वेदिक विद्यापीठ स्थापन करण्यात यावे.

  • श्री गुरूगोविंदसिंगजी विमानतळावर बंद पडलेली विमानसेवा पुन्हा एकदा सुरू करावी. अतिरिक्त भूसंपादनासाठी निधीची तरतूद मंजूर करून धावपट्टीची लांबी वाढविण्यास मंजुरी द्यावी.

  • उस्मानशाही मिल, टेक्सटाईल आणि सिफ्टा या बंद पडलेल्या उद्योगांचे पुनःर्जीवन करावे.

  • शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना लक्षात घेता दूरगामी चांगले परिणाम करणाऱ्या उपाययोजना आखाव्यात. शेतकरी कंपनी स्थापन करण्यासोबतच प्रशिक्षण केंद्र आणि मालाच्या निर्यात व प्रक्रियेसाठी पुढाकार घ्यावा. जिल्ह्यात कृषीपुरक उद्योग उभारणीवर भर द्यावा.

  • जिल्ह्यातील गोदावरी नदीसह मांजरा, मन्याड, पैनगंगा या उपनद्यांची योग्य सांगड घालून नदी जोड प्रकल्प राबविण्यात यावा.

  • जिल्ह्यातील एमआयडीसीतील बंद पडलेले उद्योग सुरू करण्यासाठी नव्याने योजना आखण्यात यावी.

  • लेंडी प्रकल्पासह इतर अनेक प्रकल्प अर्धवट अवस्थेत असून ते पूर्ण करावेत त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांचे पुर्ऩवसनही त्वरीत करावे. बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा वाढीव मावेजा द्यावा.

  • मुलभूत सोयीसुविधांचा विकास योजनेंतर्गत नांदेड - वाघाळा महापालिकेच्या हद्दीतील ६० कामांसाठी मंजूर शंभर कोटी रूपयांपैकी ५० कोटी रूपयांचा निधी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही मिळाला नसल्याने तो मिळावा.

  • नांदेड - लातूर दरम्यान थेट नवीन रेल्वे मार्ग मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारकडे तातडीने प्रस्ताव पाठवणे व या प्रकल्पासाठी राज्य शासन व केंद्र शासनाचा निधी मंजूर करणे महत्वाचे आहे.

  • हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तारित प्रकल्प जालना - नांदेड जोड द्रुतगती महामार्गाच्या कामास गती देणे व निश्‍चित कालावधीत प्रकल्प पूर्ण करावा.

  • विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कॅन्सर हॉस्पिटलला मंजुरी द्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com