
नांदेड : जिल्ह्यात एकाच दिवशी तीन ठिकाणी जबरी चोरी
नांदेड : शहर व जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे लुटमार, जबरी चोरी, खुनाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. एकाच दिवशी जिल्ह्यात तीन ठिकाणी जबरी चोरी झाली असून, सहा लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे.
शहर व जिल्ह्यातील वाढत्या चोऱ्या, खून, लुटमार यामुळे नांदेडकरांमध्ये मोठी धास्ती बसली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. या सर्व प्रकाराला पोलिसांचेतर अभय नाही ना, अशीही शंका नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. रात्री सय्यद अतिक सय्यद रशीद (रा. वाजेगाव) हे कापुस संशोधन केंद्रासमोरून जात होते. यावेळी तीन आरोपींनी त्यांना अडवून अंगावर लाल मिरची पावडर फेकून तलवारीचा धाक दाखवून जवळील रोख रक्कम व स्कुटी असा एकूण पाच लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जरीने चोरून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून, पोलिस उपनिरीक्षक श्री. कोरे तपास करत आहेत.
तसेच चिकाळा शिवारात (ता.मुदखेड) येथील आकाश अंकुश गिरे हे निसर्ग धाबा माळकौठा येथून हाॅटेल बंद करून दुचाकीवरून घरी जात होते. यावेळी तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवून रोख सहा हजार व तीन हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला आहे. मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून, श्री. शर्मा तपास करत आहेत.
याशिवाय नुरनगर सोनखेड (ता.लोहा) येथे अब्दुल वाहिद अब्दुल हमिद हे रात्री कुटुंबियांसह जेवण करून घराला कडी न लावता झोपले होते. यावेळी आरोपींनी त्यांना चाकुचा धाक धाकवून कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण एक लाख ६० हजार रुपयांचा ऐवज जबरीने चोरून नेला आहे. सोनखेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून, पोलिस उपनिरीक्षक श्री. परिहार तपास करत आहेत.
Web Title: Nanded District Robbery At Three Places In One Day
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..