नांदेड : आपल्या हक्कांसाठी दिव्यांग उतरणार रस्त्यावर, काय आहेत मागण्या ? 

प्रल्हाद कांबळे
Saturday, 10 October 2020

ता. दोन नोव्हेंबरला बेरोजगार दिव्यांगांचे विद्रोही आंदोलन. अधिका-यांना "रत्ताळे" देत काठ्या - लाठ्या कुबड्या आणि चष्मा भेट- राहुल साळवे, अध्यक्ष बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती

नांदेड : शासन स्तरावरून दिव्यांगांच्या कल्याण व पुनर्वसनासाठी दरवर्षी विविध कल्याणकारी व वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जातात. परंतु त्या योजनांची आणि शासन निर्णयांची नांदेड जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्यामुळे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी शेकडो दिव्यांगांना सोबत घेऊन गत अनेक वर्षांपासून लोकशाही मार्गाने विविध आक्रमक आंदोलने करत लढा देत संघर्ष सुरू केला. त्यात बर्यापैकी न्यायही मिळाला.

शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि दिव्यांगांप्रती उदासिनता यामुळे दिव्यांग शासनाच्या विविध योजनांपासून कोसो दुरच राहिला. एवढेच काय तर कोरोना या महामारीच्या काळातही दिव्यांगांवर उपासमारीचीच वेळ या सर्वांगाने दिव्यांगत्व धारन केलेल्या शासकीय अधिकाऱ्यांनी आणली. याच्याच निषेधार्थ बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती नांदेडकडुन शुक्रवारी (ता. नऊ) आक्टोंबर रोजी राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना १९ मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. आणि या निवेदनात ता. दोन नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद कार्यालय येथे एकाच वेळी विविध प्रकारचे विद्रोही आंदोलने करून अधिका-यांना "रत्ताळे" आणि  दिव्यांग साहित्य ज्यात अंध काठी, अंध चष्मा, कुबडी, लाठी, मुकबधीर- कर्णबधीर मशीन भेट देण्यात येणार आहोत.

हेही वाचानांदेड : माहिती अधिकार अर्ज टाकून खंडणी मागणाऱ्या युट्युब पत्रकाराला अटक

या आंदोलनात दिव्यांगानी उपस्थित रहावे

या निवेदनावर राहुल साळवे, नागनाथ कामजळगे, अमरदिप गोधने, संजय धुलधाणी, अब्दुल माजीद शेख चांद, कार्तिक भरतीपुरम, प्रदिप हणवते, सय्यद आरीफ सय्यद अली आणि मुंजाजी कावळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.तसेच या आंदोलनात जास्तीत जास्त दिव्यांगांनी सहभागी होण्याचे आवाहन सुनील जाधव, रवि कोकरे, व्यंकट कदम, आत्माराम राजेगोरे, संतोष पवार, वैभव पईतवार, भोजराज शिंदे, जयपाल आडे, आनंदा माने, विष्णु जायभाये, भाऊसाहेब टोकलवाड, विठ्ठल सुर्यवंशी, गणेश वर्षेवार, सतीश सरोदे, कमलबाई आखाडे, गोदावरी जंगीलवाड, भाग्यश्री नागेश्वर, मनिषा पारधे, कल्पना सप्ते आणि सविता गावटे यांनी केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Divyang will take to the streets for his rights, what are the demands nanded news