नांदेड : माजी सैनिकांना ईसीएचएस मेडीकलचे कार्डस उपलब्ध

प्रल्हाद कांबळे
Saturday, 29 August 2020

कार्डस प्राप्त करण्यासाठी  माजी सैनिकांनी त्यांच्याकडील जुने मेडीकल कार्डस, पीपीओ प्रत व ओटीपीनंबर हे ईसीएचएस पॉलिक्लिनिक नांदेड येथे जमा करावे, असे आवाहन सैनिक कल्याण अधिकारी व ईसीएचएसचे अधिकारी यांनी केले आहे.

नांदेड : स्टेशन हेडक्वार्टर औरंगाबाद व पुणे येथील कार्यालयात माजी सैनिक संघटनेने पाठपुरावा केल्याने माजी सैनिकांचे मेडीकल कार्डस आता नांदेड येथुनच वितरणाची अनुमती प्राप्त झाली आहे. कार्डस प्राप्त करण्यासाठी  माजी सैनिकांनी त्यांच्याकडील जुने मेडीकल कार्डस, पीपीओ प्रत व ओटीपीनंबर हे ईसीएचएस पॉलिक्लिनिक नांदेड येथे जमा करावे, असे आवाहन सैनिक कल्याण अधिकारी व ईसीएचएसचे अधिकारी यांनी केले आहे.

केंद्र सरकारची माजी सैनिकांसाठी ईसीएचएस पॉलिक्लिनिक नांदेड येथे सन 2011 पासुन सुरु आहे. या पॉलिक्लिनिकमध्ये नांदेड, परभणी, हिंगोली व वाशिम जिल्हयातील माजी सैनिकांसाठी ओपीडी सर्व्हिसेस ज्यामधे मेडीकल स्पेशलिस्ट, डेन्टल स्पेशलिस्ट, पॅथोलोजी लॅब व औषधी उपलब्ध आहेत. तसेच इतर तज्ज्ञ डॉक्टरर्सच्या उपचारासाठी देशात विविध ठिकाणी रेफरल केले जाते. या सुविधा प्राप्त करण्यासाठी माजी सैनिकांकडे मेडीकल कार्ड असणे आवयश्यक असते. माजी सैनिकांचे मेडीकल कार्डस सध्या औरंगाबाद व अहमदनगर येथून वितरीत केले जात होते. सर्व माजी सैनिकांना औरंगाबाद व अहमदनगरला जाऊन कार्डस प्राप्त करणे शक्य नसल्याने माजी सैनिक संघटना व माजी सैनिकांनी  मेडीकल कार्डस हे नांदेड पॉलीक्लिनिक मधूनच मिळावे अशी मागणी केली होती.

हेही वाचा दऱ्याखोऱ्यात बहरली वनराई

दोन सप्टेंबर रोजी रेतीसाठ्याचा लिलाव

नांदेड :- नांदेड तालुक्यात विनापरवानगी अनाधिकृत गोळा केलेल्या रेतीसाठा महसूल विभागाने जप्त केला आहे. त्याची ईटीएस मोजणी करण्यात आली आहे. या रेतीसाठ्याचा लिलाव उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या अधिपत्याखाली 2 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय नांदेड येथे केला जाणार आहे.

सदर अवैध रेतीसाठा हा 425 ब्रासची  दुसरी फेरी असून सदर रेतीसाठा मौजे ब्राम्हणवाडा येथे उपलब्ध आहे. सदर रेतीसाठा गट नंबर निहाय असून तो पाहून तपासून घेऊन लिलावात भाग घ्यावा व अटी आणि शर्तीबाबतची माहिती गौण खनिज विभागात कार्यालयीन वेळेत पाहून घ्यावी, असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: ECHS Medical cards available to ex-servicemen nanded news