esakal | नांदेड -  शनिवारी १८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले 
sakal

बोलून बातमी शोधा

file Photo

शनिवारी ६४३ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ६२१ निगेटिव्ह, १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता २१ हजार २५७ एवढी झाली. यातील २० हजार २०१ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.

नांदेड -  शनिवारी १८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाली आहे. शनिवारी (ता.२६) कोरोना अहवालानुसार जिल्हाभरात २९ कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर नव्याने १८ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत.
 
शुक्रवारी (ता.२५) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या अहवालानुसार शनिवारी ६४३ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ६२१ निगेटिव्ह, १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता २१ हजार २५७ एवढी झाली. यातील २० हजार २०१ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकूण २८७ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरू असून त्यातील १४ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यातील ५७० व्यक्तींना प्राण गमवावे लागले आहेत. 

हेही वाचा- स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाची पेट- २०२० परीक्षा दोन टप्प्यात​

घरी बरे होण्याचे प्रमाण ९४ वरुन ९५ टक्क्यावर

शनिवारी बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय दोन, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण १२, हदगाव चार, देगलूर सात, खासगी रुग्णालय चार असे २९ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्यावरुन ९५ टक्के इतके झाले आहे. 

हेही वाचले पाहिजे - मालमतेच्या कारणावरुन विवाहितेस पेटवले; चौघांवर गुन्हा दाखल ​

अशी आहे जिल्ह्यातील रुग्णांची स्थिती

शनिवारी बाधितांमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात- सात, लोहा - एक, अर्धापूर - एक, यवतमाळ एक, नांदेड ग्रामीण - एक, नायगाव - एक, किनवट - एक, भोकर - एक, पंजाब - एक, देगलूर - एक, हिंगोली - दोन असे १८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात २८७ बाधितांवर औषधोपचार सुरू आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे २९, जिल्हा शासकीय रुग्णालय २४, जिल्हा रुग्णालय (नवी इमारत) २३, मुखेड १५, देगलूर १६, हदगाव सहा, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण १०३, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण - ५१, औरंगाबाद येथे संदर्भीत एक, हैद्राबाद येथे एक व खासगी रुग्णालय १८ आहेत. 

कोरोना मीटर ः 

शनिवारी पॉझिटिव्ह - १८ 
शनिवारी कोरोनामुक्त - २९ 
शनिवारी मृत्यू - शुन्य 
एकूण पॉझिटिव्ह संख्या २१ हजार २५७ 
एकूण कोरोनामुक्त- २० हजार २०१ 
एकूण मृत्यू संख्या-५७० 
प्रलंबित स्वॅब - ३६५ 
रुग्णालयात उपचार सुरु - २८७ 
अतिगंभीर प्रकृती रुग्ण - १४ 
 

loading image