esakal | नांदेड : गडगा ग्रामपंचायतमध्ये १८ लाखाचा अपहार; अखेर ग्रामसेवक पठाणवर गुन्हा

बोलून बातमी शोधा

file photo}

हा प्रश्न आमदार राजेश पवार यांनी विधानसभेत नेल्यानंतरच नायगावच्या गटविकास अधिकाऱ्यांना जाग आली. 

नांदेड : गडगा ग्रामपंचायतमध्ये १८ लाखाचा अपहार; अखेर ग्रामसेवक पठाणवर गुन्हा
sakal_logo
By
प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव ( जिल्हा नांदेड ) : एक वर्षाच्या कालावधीत गडगा ग्रामपंचायतमध्ये १७ लाख ८७ हजार ३४३ रुपयाचा अपहार करणारे ग्रामसेवक महम्मद रफी पठाण यांच्या विरोधात नायगाव पोलिस ठाण्यात (ता. २६) रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रश्न आमदार राजेश पवार यांनी विधानसभेत नेल्यानंतरच नायगावच्या गटविकास अधिकाऱ्यांना जाग आली. 

मागच्या पाच वर्षांपासून गडगा ग्रामपंचायत वादग्रस्त ठरत आली असून सरपंच व ग्रामसेवकांच्या संगणभताने १४ व्या वित आयोगासह विविध योजनेच्या निधीत मोठ्या प्रमाणात अपहार करण्यात आला आहे. यापूर्वी पाच ग्रामसेवकावर निलंबनाची तर कारवाई झालीच पण फसवणूक केल्याचेही गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे नवीन ग्रामसेवक पठाण हे ग्रामपंचायतचा कारभार पारदर्शक करतील असे वाटत होते पण ते तर पुर्वीच्या ग्रामसेवकापेक्षा भारी निघाले. यांनी एका वर्षाच्या काळातच लाखो रुपयाचा अपहार केला.

सुरुवातीला ९५ हजाराचे दोन लाख ९५ हजार केल्या प्रकरणाची वाच्यता झाली. या प्रकरणाची चौकशी झाली असता मोठाच घोळ समोर आला. त्यामुळे पठाण यांची कारकीर्द वादग्रस्त ठरण्याबरोबरच भ्रष्ट ठरली. झालेल्या चौकशीअंती पठाण यांना गडगा ग्रामपंचायतमधील अर्थिक अपहार प्रकरणी दोषी ठरवून निलंबित करण्यात आले होते. वास्तविक सदर प्रकरणी फौजदारी कारवाई करणे गरजेचे असताना गटविकास अधिकारी प्रभाकर फांजेवाड यांनी पठाण यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला होता.

त्यामुळे आ. राजेश पवार यांनी गडगा अपहार प्रकरण थेट विधानसभेत नेले त्यामुळे नायगाव पंचायत समितीत एकच खळबळ उडाली. परिणामी वरिष्ठांना लेखी उतर देण्याबरोबरच गुन्हाही नोंद करावा लागला. काल ता. २६ रोजी विस्तार अधिकारी सूर्यकांत कांबळे यांनी नायगाव पोलिस ठाण्यात  गडगा ग्रामसेवक महम्मद रफी अमिरखान पठाण यांनी १७ लाख ८७ हजार ३४३ रुपये बनावट एजन्सीच्या नावावर नायगाव येथील भारतीय स्टेट बँकेच्या खात्यातून वर्ग केल्याची तक्रार दिली. या तक्रारीवरुन ४२० सह विविध कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे