नांदेड : संचारबंदी काळात रुग्णसेवा अधिक सक्षम करा- समाधान जाधव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले. यावेळी नव्याने उपलब्ध झालेल्या रुग्णवाहिकेची पाहणी देखील त्यांनी केली.

नांदेड : संचारबंदी काळात रुग्णसेवा अधिक सक्षम करा- समाधान जाधव

वाई बाजार ( जिल्हा नांदेड) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नांदेड जिल्हा प्रशासनाने संचारबंदी घोषित केली आहे. शिवाय बदलत्या हवामानाच्या परिणामामुळे व्हायरल फिव्हरने थैमान घातले आहे.

या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधींचा तुटवडा निर्माण होऊ नये या दृष्टीने जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव यांनी वाई बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन उपलब्ध बाबीची खातरजमा करत आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले. यावेळी नव्याने उपलब्ध झालेल्या रुग्णवाहिकेची पाहणी देखील त्यांनी केली.

हेही वाचाखळबळजनक घटना : नांदेड जिल्हा कारागृहातील कैद्यांना कोरोनाची लागण; सर्वांची प्रकृती स्थिर

वातावरणातील बदलाच्या परिणामामुळे सध्या सर्दी, खोकला, ताप व डोकेदुखी आदी आजाराने थैमान घातले आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या दररोज हजार चा आकडा पार करत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी नांदेड जिल्ह्यात संचारबंदी घोषित केली आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य रुग्णांची हेळसांड होऊ नये यासाठी औषध साठा, अत्यावश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध असल्याची खातरजमा करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव यांनी गुरुवारी (ता. २५) रोजी भेट देऊन प्राथमिक आरोग्य केंद्र वाई बाजाराला भेट देऊन पाहणी केली. दरम्यान नुकतेच आमदार भीमराव केराम यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना निधीतून मंजूर सर्व सोयी सुविधा युक्त असलेल्या आधुनिक रुग्णवाहिकेची पाहणी करुन जाधव यांनी समाधान व्यक्त करत रुग्णवाहिकेसाठी पाठपुरावा केल्यामुळे आमदार भीमराव केराम यांचे आभार मानले.

बदलत्या हवामानाच्या परिणामामुळे व्हायरल फिव्हरने थैमान घातले या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्राचा आढावा घेतला असता अठरा गावातील सहा आरोग्य उपकेंद्र स्तरावर दररोज एंटीजन टेस्ट चालू असून याचा परिणाम थोड्याफार प्रमाणात दैनंदिन ओपीडीवर होत असल्याची माहिती समोर आली. औषध साठा उपलब्ध असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. पाहणी दौऱ्यात जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव यांच्या समवेत उपसरपंच हाजी उस्मान खान, नविद खान, कैलाश बेहेरे, अजय कुमार कंधारे, अमजत हैदरखान, रुपेश मोरे, नंदू कटकमवार, उकंडराव जाधव व दुर्गादास राठोड यांनी भेट दिली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीनिवास हुलसुरे, डॉ. स्वप्नील राठोड, डॉ. पी. एन. भुरके, आरोग्य सहाय्यक निर्मला जयस्वाल, डी. के. जोशी,आरोग्य सेविका एस. ए. खान, औषध निर्माण अधिकारी संदेश बेहेरे, रुग्णवाहिका चालक गणेशआप्पा कोरे, परिचारिका निर्जला बेद्रे व हनुमंत अंदगुले यांची उपस्थिती होती.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

Web Title: Nanded Enable Patient Care During Curfew Samadhan Jadhav

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NandedKandahar