esakal | नांदेड - दूर्धर आजारग्रस्त सेवकाच्या ‘समाजसेवे’ची अखेर 
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Photo

माणूस कुणीही आणि कितीही मोठा असला तरी, त्याला मृत्यूच्या शेवटच्या घटकापर्यंतच समाज आठवणीत ठेवतो. एकदा त्या व्यक्तीला स्मशानात नेऊन सर्व सोपस्कर अंत्यविधी उरकुन घरी परतले, की त्याच्या आठवणी विस्मरणात जातात. पुढे तो कुणाला साधा आठवत देखील नाही. परंतु जेव्हा जेव्हा काम करण्याची वेळ येते तेव्हा तितक्यापूर्तीच त्याची आठवण नक्कीच होते. गंगाधर सोलापूरे हा देखील कुणी प्रसिद्ध समाजसेवक नसला, तरी आपल्या कामातून त्याने ४२ वर्ष समाजाची प्रामाणिक सेवा केली इतकेच. 

नांदेड - दूर्धर आजारग्रस्त सेवकाच्या ‘समाजसेवे’ची अखेर 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - समाज सेवक म्हटले की अनेकांना संत गाडगे बाबा, मदर तेरेसा, बाबा आमटे अशी मोजकीच नावे आठवतात. १९७८ मध्ये गंगाधर सोलापूरे नावाच्या एका व्यक्तीला कुष्ठरोग झाला. उपचारासाठी त्यांनी नांदेडचे नेरली येथील कुष्ठधाम गाठले. इथे त्याच्यावर उपचार सुरु झाले. घरात परत कुणी घेणार नाही म्हणून या तरुणाने नेरलीच्या कुष्ठधामात राहुन शेती करुन सेवा करण्याचा निश्‍चय केला. कुष्ठधाम मध्ये उत्पादित भाजिपाल, फळे, दूध शहरात विक्री करुन त्याचा चोख हिशोब संस्थेकडे देत असे तीन चार वर्षात त्याने अतिशय अशा दूर्धर आजारावर काही प्रमाणात का होईना विजय मिळविला होता. 

पुढे तो शहरात जागा घेऊन राहु लागला. मामाने विश्‍वास दाखवल्याने मामाच्या मुलीसोबत लग्न केले. संसार सुरु झाला. एक मुलगाही झाला. त्याच्यातील प्रामाणिकपणा पाहून गोवर्धन घाट स्मशान भूमितील शांतीधाम ट्रस्टने त्यांना काम दिले. मृत व्यक्तीला लागणारे कापड, लाकुड खरेदी,पैशांचा हिशोब ठेवणे अशी कामे होती. पुढे त्यांना कुणा दात्यांना देणगी स्वरुपात कुठलीही वस्तू अथवा पैसा, धनादेश द्यायचा असेल तेव्हा लोक त्यांना घरी बोलावून अगदी विश्‍वासाने त्यांच्याकडे सर्व रक्कम सुपूर्द करत असत. 

हेही वाचा- KEM हॉस्पिटल व्हायरल व्हिडिओ प्रकरणी मुख्य आरोपीला अटक ​

मेसेज वाचुन तब्बल ८४ हजार रुपयाची मदत​

स्वतः दुर्धर आजाराने त्रस्त असतानाही गंगाधर सोलापुरे याने ४२ वर्ष प्रामाणिक काम करून, आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी खर्ची घातले. अशा या समाजसेवकाची (ता. तीन) सप्टेंबरला अखेर झाली. आणि त्याचे कुटुंबिय उघड्यावर आल्याचे काही दात्यांना समजले. अनेकांनी जमेल त्या पद्धतीने सोलापूरे कुटुंबियांना मदत करण्याचे ठरविले. फेसबुक, व्हॉस्टअप वरुन फिरत असलेला एक मेसेज वाचुन तब्बल ८४ हजार रुपयाची मदत गोळा झाली. 

हेही वाचले पाहिजे- बेरोजगारांसाठी पिठाची गिरणी ठरतेय उपजिविकेचे साधन ​

कै.सदाशिव पाटील, गंगाधर सोलापूरे यांना कुष्ठधाम येथे श्रद्धांजली

ज्येष्ठ समाजवादी नेते कै.सदाशिव पाटील आणि गंगाधर सोलापूरे यांना गुरुवारी (ता. १७) सप्टेंबरला नेरली नंदनवन कुष्ठधाम येथे श्रद्धांजली अर्पण करुन सोलापूरे यांच्या पत्नी शिवनंदा आणि बारावी कम्प्युटरचे शिक्षण घेत असलेल्या ओमकारला  बोलावून त्यांच्याकडे ८४ हजार रुपयाची मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी कुष्ठधामचे अध्यक्ष डॉ. सुनिल कदम, हर्शद शहा,  डॉ. दि. बा. जोशी, ज्येष्ठ समाजसेवक बनारसदासजी अग्रवाल, विश्‍वस्त एम, आर. जाधव, तुकाराम गायकवाड, व्यवस्थापीका शीला गायकवाड व कृष्णा उमरीकर यांच्यासह अनेकाजण उपस्थित होते.