Nanded Flood: जुन्या नांदेडला पाण्याचा वेढा, पूरस्थिती कायम; मनपाकडून ४६१ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
Godavari River: जुन्या नांदेड शहरातील अनेक भागांमध्ये पुराचे पाणी शिरले असून, शेकडो घरं आणि दुकाने पाण्याखाली गेली आहेत. महापालिकेने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून तात्पुरत्या निवारा केंद्रात ठेवले आहे.
नांदेड : जुन्या नांदेड शहरासह गोदावरी नदीकाठच्या भागात गुरुवारी (ता. २५) सुद्धा पूरस्थिती कायम राहिली. नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने शहरातील अनेक भागांमध्ये बॅक वॉटर शिरले असून, शेकडो घरे व दुकाने पाण्याखाली गेली आहेत.