नांदेड : बनावट रासायनिक खत शेतकऱ्यांच्या माथी, गुन्हा दाखल

प्रल्हाद कांबळे
Saturday, 28 November 2020

छोटा टेम्पो ( एमएच २२-एएन-२२०७) मध्ये आयपीएल कंपनीचा बोगस पोटॅस खताच्या बॅगा त्याची (किंमत ३५ हजार) रुपये आहे. हे खत विक्रीसाठी घेऊन जाताना जप्त करण्यात आले. हा प्रकार लोहा ते पालम जाणाऱ्या रस्त्यावर बालाजी मंदिरासमोर ता. २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास उघडकीस आला. 

नांदेड : उच्च दर्जाचे रासायनीक खत असल्याचे भासवून चक्क बोगस खताचा पुरवठा करणाऱ्या सात जणांविरुद्ध लोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मंडळीविरुद्ध फसवणुक, काॅपी राईट अॅक्टअंतर्गत गुन्हा नोंदवून बोगस खत व टेम्पो जप्त केले आहे. 

छोटा टेम्पो ( एमएच २२-एएन-२२०७) मध्ये आयपीएल कंपनीचा बोगस पोटॅस खताच्या बॅगा त्याची (किंमत ३५ हजार) रुपये आहे. हे खत विक्रीसाठी घेऊन जाताना जप्त करण्यात आले. हा प्रकार लोहा ते पालम जाणाऱ्या रस्त्यावर बालाजी मंदिरासमोर ता. २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास उघडकीस आला. 

हेही वाचा -  Video - नांदेडला दंडात्मक कारवाईसाठी महापालिका पथक झाले कार्यान्वित -

आरोपी दत्तानंद आबाबासाहेब देशमुख (वय ३१) रा. टाकळी ता. परळी जिल्हा बीड, अप्पा रा. नांदेड, जी. एम. गफार हैद्राबाद, गजानन चव्हाण नांदेड, सोनी रा. नांदेड, धनंजय मनोहर मोरे रा. उकडगाव ता. सोनपेठ जिल्हा परभणी, संजीवन फर्टीलायझरचे मालक वाशिम यांनी संगणमत करुन आयपीएल कंपनीचे बोगस पोटॅश खत ६० बॅगा ( ३४ हजार ८००) आणि सहा लाखाचा टेम्पो असा साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. आयपीएल कंपनीचे बनावट लेबल लावून बोगस खत तयार करुन विक्री करुन शासनाची, शेतकऱ्यांची व आयपीएल कंपनीची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. यावरुन पोलिस अमलदार माधव परसराम डफडे (वय ३२)  यांच्या फिर्यादीवरुन लोहा पोलिस ठाण्यात फसवणुकीसह कॉपीराइट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक भागवत जायभाये करत आहेत. पोलिसांनी दत्तानंद देशमुख आणि धनंजय मनोहर मोरे या दोघांना अटक केली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Fake chemical fertilizer filed against farmers nanded news