Crop
Cropsakal

नांदेड : नव्या निकषानुसार लागणार ५६७ कोटी

जुलैमधील अतिवृष्टीच्या नुकसानीबाबत ‘सस्पेंस’ कायम

नांदेड : राज्य सरकारने बुधवारी (ता. १३) राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत नुकसानग्रस्तांना वाढीव मदत देण्याचे जाहीर केले. यात जिरायतीसाठी दहा हजार, बागायतीसाठी पंधरा हजार तर बहुवार्षीक फळपिकांसाठी हेक्टरी २५ हजार रुपयांचा समावेश आहे. या नव्या निकषानुसार जिल्ह्याला ५६७ कोटी १५ लाखांचा निधी लागणार आहे. यात जुलैमधील ४४ हजार ६०९ हेक्टरचा समावेश नाही. यामुळे जुलैमधील नुकसानग्रस्तांना नव्या निकषानुसार मदत मिळण्याबाबत संभ्रम आहे.

जिल्ह्यात जुलै, ऑगष्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पुरस्थिती उद्भवून सहा लाख सहा हजार ३२८ हेक्टरमधील जिरायती, बागायतीसह फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. यात जुलैमधील ७१ हजार २२१ शेतकऱ्यांना ३० कोटी ३५ लाख तर आॅगष्ट व सप्टेंबरमधील पाच लाख ६१ हजार ७१९ शेतकरी असे एकूण आठ लाख ६१ हजार ७५६ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या सहा लाख सहा हजार ३२८ हेक्टरच्या भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने ४१९ कोटी ४२ लाख रुपयांची मागणी केली होती.

Crop
प्रा. राजन शिंदे खून प्रकरण : ‘एसआयटी’चे पथक देऊळगाव राजाला रवाना

परंतु यंदा शेतकऱ्यांचे नुकसान अधिक झाल्याने शासनाकडून पश्‍चिम महाराष्ट्रानुसार एनडीआरएफ निकषाच्या तिप्पट भरपाईची मागणी जोर धरु लागली होती. यामुळे बुधवारी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. यात मंत्रीमंडळाने जिरायतीसाठी दहा हजार, बागायतीसाठी पंधरा हजार तर बहूवार्षीक फळपिकांसाठी हेक्टरी २५ हजार रुपयाची मदत जाहीर केली. या नव्या निकषानुसार जिल्ह्याला ५६७ कोटी १५ लाखांचा निधी लागणार आहे.

जुलैमधील नुकसानग्रस्तांबाबत संभ्रम

जिल्ह्यात जुलै महिन्यात जिरायती व बागायती अशा एकूण ७१ हजार २२१ शेतकऱ्यांचे ४४ हजार ६०९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. यासाठी शासनाने ता. सहा आक्टोबर रोजी आदेश काढून जून्या दरानुसार ३० कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. यामुळे जुलैमधील नुकसानग्रस्तांना नव्या निकषानुसार मदत मिळण्याबाबत अद्याप संभ्रम आहे.

Crop
आव्हाडांऐवजी दुसऱ्या कुणाला त्वरित जामीन मिळाला असता का? - राम कदम

जुलै व ऑगस्ट-सप्टेंबरमधील

एकूण नुकसान व लागणारा निधी

तालुका शेतकरी नुकसान क्षेत्र अपेक्षीत निधी

नांदेड ४२०९४ २३१६० २२ कोटी ०१ लाख

अर्धापूर ३२४१२ २२६३६ २२ कोटी ७० लाख

कंधार ७४८०१ ५०७८२ ५० कोटी ६३ लाख

लोहा ११७९६२ ५८२६२ ५७ कोटी ५७ लाख

बिलोली ५९१३० ४२०२५ ३४ कोटी ५५ लाख

नायगाव ५४८४३ ४२८९१ ४२ कोटी ७५ लाख

देगलूर ६२१३७ ४५७९४ ३५ कोटी ९६ लाख

मुखेड ८०२७७ ५८४६४ ५८ कोटी ५५ लाख

भोकर ४२३१७ ३८४८५ ३७ कोटी ३१ लाख

मुदखेड ३००३२ २२३५५ २२ कोटी ९३ लाख

धर्माबाद ३७७८० २५३९७ २५ कोटी ११ लाख

उमरी ३३८७३ ३३९१९ ३७ कोटी ०४ लाख

हदगाव ८२५३२ ५०००२ ५० कोटी

हिमायतनगर ३२५२१ २१९७२ २१ कोटी ८४ लाख

किनवट ५३९७० ५६५५३ १३ कोटी ६३ लाख

माहूर २५०७४ १३६३० नऊ कोटी २७ लाख

एकूण ८६१७५६ ६०६३२८ ५६७ कोटी १५ लाख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com