नांदेड : नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात बैलपोळा सणाच्या (Bail Pola Festival) दिवशी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. अतिवृष्टी, नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून एका अल्पभूधारक शेतकऱ्याने (Nanded Farmer) गुरुवारी (21 ऑगस्ट) आत्महत्या केली. मुलाच्या मृत्यूचा मानसिक धक्का सहन न झाल्याने त्याची आईदेखील अवघ्या 24 तासांत मरण पावली. या दुर्दैवी घटनेने फुलवळ गाव शोकसागरात बुडाले आहे.