नांदेड : अंगावर पेट्रोल टाकून शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न, भोकरच्या एसबीआय बॅंक समोरिल प्रकार

बाबूराव पाटील
Thursday, 26 November 2020

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार.तालूक्यात मागील अनेक दिवसांपासून शेतकरी पीककर्ज घेण्यासाठी बॅकेत खेटे घालत आहेत.शासन आणि बॅंकेच्या टोलवाटोलवीत शेतकरी अडचणीत सापडला आहे.कुणाच पीककर्ज माफ तर कुणाचं नावच यादित आलं नाही.

भोकर (जिल्हा नांदेड) : शहरातील स्टेटबॅक आॅफ इंडिया शाखेनी शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याने  अधिका-यांच्या जाचाला कंटाळून एका शेतकऱ्यानी बूधवारी (ता.२५)  सायंकाळी चार वाजताच्या सुमारास बॅंकेच्या प्रवेशद्वारासमोर अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. तेथील नागरिकांनी वेळीच आवर घातल्याने  सूदैवाने होणारा अनर्थ टळला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार.तालूक्यात मागील अनेक दिवसांपासून शेतकरी पीककर्ज घेण्यासाठी बॅकेत खेटे घालत आहेत. शासन आणि बॅंकेच्या टोलवाटोलवीत शेतकरी अडचणीत सापडला आहे. कुणाच पीककर्ज माफ तर कुणाचं नावच यादित आलं नाही. या प्रकाराने शेतकरी हैराण झाला आहे.दरम्यान कोरोना विषाणूंमुळे लाकडाऊन लागल्याने त्याचा फटका सहन करावा लागला आहे. अशाच संकटात सापडलेला शेतकरी नामे पांडुरंग लक्ष्मण चव्हाण (वय ४८)राहणार धारजणी ता.भोकर  यांनी येथील बॅंकेत पीक कर्जासाठी मागणी केली होती.

हेही वाचा - कुष्ठरोग व क्षयरोग रुग्णांनी स्वत:हून उपचारासाठी पुढे यावे- जिल्हाधिकारी डॉ. विपीन -

संबंधित शाखा अधिकाऱ्याने पीक कर्ज देण्यास टाळाटाळ केल्याने सदरील शेतकऱ्यांनी धारणी हे गाव उमरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने शाखा अधिकाराचा त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करणार असे लेखी निवेदन दिले होते. शेतकऱ्याची समजूत काढून आत्महत्या करणार नाही असे लेखी त्याच्याकडून  लीहून घेतले होते. कर्ज मिळत नसल्याने बुधवारी पांडुरंग चव्हाण यांनी येथील बँकेच्यासमोर सायंकाळी चार वाजताच्या सुमारास अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला यावेळी तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्याच्या अंगावर पाणी टाकून त्याला रोखण्याचा प्रयत्न केल्याने सुदैवाने  होणारा अनर्थ टळला आहे. सदरील घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी शेतकरी पांडुरंग चव्हाण यांना ताब्यात घेतले आहे. याबाबत गून्हा दाखल करण्याची प्रक्रिया सूरू असून ऊशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

मी अनेक दिवसांपासून पीक कर्जासाठी बँकेकडे चकरा घालत आहे. पण अधिकारी उडवाउडवीचे उत्तर देऊन टाळाटाळ करत  होते. कर्ज नाही दिल्यास मी आत्महत्या करणार अशी तक्रार दिली होती. त्याची कूणीच दखल घेतली नाही. माझी पत्नी धूरपताबाई यामुळे आजारी पडली आहे. तीच्यावर नांदेडला खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. नाईलाजास्तव मला टोकाची भूमिका घ्यावी लागली आहे.

-शेतकरी पांडुरंग चव्हाण..धारजणी ता.भोकर

सदरील प्रकरणी बँकेचा अधिकाऱ्याकडून रीतसर तक्रार आल्यावर आम्ही शेतकर-या विरुद्ध गुन्हा दाखल करणार आहोत.सध्या तरी गून्हा दाखल केला नाही. शेतकऱ्याला  चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे

- विकास पाटील, पोलीस निरीक्षक,  भोकर

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Farmers attempt suicide by throwing petrol on their bodies Bhokar's case against SBI Bank nanded news