नांदेड : निर्यातक्षम फळे व भाजीपाला वाणांची शक्य / अशक्यता तपासणीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी

प्रल्हाद कांबळे
Saturday, 19 December 2020

निर्यातक्षम दर्जाची फळे व भाजीपाला उत्पादन करुन निर्यात करणेसाठी शेतीमाल असणे आवश्यक आहे. आशा मागणीची पुर्तता करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फळे व भाजीपाला पिकांची शेतकऱ्यांनी शक्य / अशक्यता नेटद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे.

नांदेड : जिल्ह्यामध्ये फळे व भाजीपाला क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. केळी, आंबा, पेरु, मोसंबी या पिकांचे क्षेत्र वाढत आहे. तसेच फळपिके भाजीपाला निर्यातीसाठी मोठा वाव नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. निर्यातक्षम दर्जाची फळे व भाजीपाला उत्पादन करुन निर्यात करणेसाठी शेतीमाल असणे आवश्यक आहे. अशा मागणीची पुर्तता करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फळे व भाजीपाला पिकांची शेतकऱ्यांनी शक्य / अशक्यता नेटद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे.

किडनाशक उर्वरित अंश व किड रोगमुक्त उत्पादनाची हमी देण्यासाठी अपेडाने निर्यातक्षम बागांच्या नोंदणीसाठी आंबा फळपिकासाठी मँगोनेट, डाळिंब पिकासाठी अनारनेट, मिर्ची, भेंडी, टोमॅटो व इतर पिकासाठी व्हेजनेट व लिंबु, मोसंबी, संत्रा फळपिकासाठी सिट्रसनेट ही प्रणाली विकसीत केली आहे. 

हेही वाचा -  मातृवंदन योजनेतून गर्भवतींचे पोषण, ५३ हजार महिलांना २१ कोटींचा मिळाला लाभ -

याअंतर्गत शेतकऱ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीने नोंदणी  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडे अर्ज सादर करावा. ऑनलाईन पध्दतीने शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी फलोत्पादन विभाग अपेडा मार्फत फार्म रजिस्ट्रेशन कनेक्ट मोबाईलॲप डाऊनलोड करुन त्यामध्ये स्वत:ची माहिती, नाव, मोबाईल क्रमांक भरुन ऑनलाईन पध्दतीने नोंदणी अधिकारी यांचेकडे अर्ज दाखल करण्याची सुविधा ऑनलाईन पध्दतीने करता येईल. यासंदर्भात काही अडचणी उद्भवल्यास जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय नांदेड यांच्याशी संपर्क साधावा, असे अवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Farmers should register online for feasibility / impossibility of exportable fruit and vegetable varieties nanded news