नांदेड ः उद्योजकता जागृती अभियानात पंधराशे विद्यार्थ्यांचा सहभाग

File Photo
File Photo

नांदेड ः राज्यभरातील तंत्रनिकेतने, अभियांत्रिकी आणि अन्य शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांसाठी अवेअरनेस क्विझ ऑन आंत्रप्रेनरशिप अँड स्टार्टअप्स या नाविन्यपूर्ण ऑनलाईन राज्यस्तरीय आॅनलाईन प्रश्नमंजूषेचे नांदेडच्या शासकीय तंत्रनिकेतन या संस्थेच्या यंत्र अभियांत्रिकी विभागाने प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात होते.

राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने राजकीय, सामाजिक व शैक्षणिक संस्था यांच्या मार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. परंतू हे सर्व कार्यक्रम एका छताखाली न येता ते आॅनलाईन पद्धतीने घेतले जात आहेत. सुरुवातीच्या काळात आॅनलाईन कार्यक्रमास हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु मागील सहा महिण्यापासून घरात कोंडुन असलेल्या विद्यार्थ्यांसह पालक व घरातील ज्येष्ठ नागरीकांनी देखील आॅनलाईन शिक्षण, योगा क्लासेस, शिवणकाम, मेकॅनिक अशा विविध पद्धतीचे आॅनलाई पद्धतीने शिक्षणास प्रतिसाद दिल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा- नांदेड : दयानंद वनंजे यांच्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाने खळबळ

राज्यभरातील पंधराशे विद्यार्थ्यांचा सहभाग

देशाच्या स्वयंपूर्णतेच्या दृष्टीने उद्योजकता आणि स्टार्टअप्स यांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. विद्यार्थीदशेतच उद्योजकता आणि स्टार्टअपबाबतच्या विचाराचे बीजारोपण व्हावे आणि जिज्ञासा निर्माण व्हावी, या उद्देशाने आयोजिलेल्या या उपक्रमास विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. राज्यातील विविध शासकीय व खाजगी अभियांत्रिकी संस्था, तंत्रनिकेतने आणि व्यवस्थापन शाखेच्या एकूण एक हजार ५०० विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला होता. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना ई-प्रमाणपत्रे देण्यात आली.

हेही वाचा- नांदेडमध्ये ‘सी.एच.बी.’ प्राध्यापकांनी दिल्या काळ्या शुभेच्छा

नवनवीन आव्हानांना सामोरे जाताना

उपक्रम, संकल्पना व संयोजक म्हणून विभाग प्रमुख राजीव सकळकळे आणि समन्वयक म्हणून ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. संतोष चौधरी यांनी जबाबदारी पार पाडली. बदलत्या परिस्थितीत नवनवीन आव्हानांना सामोरे जाताना ‘विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था’ असे अभिनव उपक्रम सातत्याने राबवत आहे, अशी माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांनी दिली. तंत्रशिक्षण पदविका प्रवेश प्रक्रिया सुरु असताना विद्यार्थी आणि पालक यांच्या दृष्टीने सदर उपक्रम उल्लेखनीय ठरतो.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com