नांदेड - शनिवारी पाचशे पेक्षा अधिक फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस - जिल्हाधिकारी डॉ. विपीन 

शिवचरण वावळे
Friday, 15 January 2021

पहिल्या दिवशी जिल्ह्यातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालय, श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय, हैदरबाग येथील महापालिकेचे रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय हदगाव, मुदखेड तालुक्यातील मुगट उप जिल्हा रुग्णालय या पाच सेंटरवर नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार

नांदेड - केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यातील पाच केंद्रावर पहिल्या दिवशी जवळपास साडेपाचशे लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. त्यासाठी सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शुक्रवारी (ता. १५) पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर आदींची उपस्थिती होती. यावेळी डॉ. विपीन म्हणाले की, पहिल्या दिवशी जिल्ह्यातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालय, श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय, हैदरबाग येथील महापालिकेचे रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय हदगाव, मुदखेड तालुक्यातील मुगट उप जिल्हा रुग्णालय या पाच सेंटरवर नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. 

हेही वाचा- सावधान : अर्धापुरात बिबट्या पडला विहिरीत; रेस्क्यु आॅपरेशन सुरु ​

लाभार्थ्यांच्या शंकांचे निरसन

लस देण्यासाठी सेंटरच्या ठिकाणी वेटींग रुम, व्हॅक्सीन रुम आणि निरिक्षण कक्ष तयार करण्यात आले आहेत. लस देण्यापूर्वी लाभार्थ्यांच्या शंकांचे निरसन करुन नंतर त्यांना लस देण्यासाठी पुढे सोडण्यात येणार आहे. लस दिल्यानंतर त्या लाभार्थ्यास कुठला ही साईड इफेक्ट होतो का? यासाठी त्यांना अर्धा तास तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुसरा डोस कधी दिला जाणार याबद्दलची माहिती देऊन त्यांना घरी सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

अशी आहे लाभार्थ्यांची नोंद 

एकूण नोंद ः १७ हजार ९९ लाभार्थी 
१) शहरी भाग ः शासकीय लाभार्थी - दोन हजार १८१, खासगी लाभार्थी - एक हजार ८२०, एकूण लाभार्थी - चार हजार शंभर 
२) ग्रामिण भाग ः शासकीय लाभार्थी - १२ हजार २४२, खासगी लाभार्थी - ८५६, एकुण लाभार्थी - १३ हजार ९८ 

हेही वाचा- नामांतराचा संघर्ष जिंकला, राजकीय संघर्षाचे काय? ज्येष्ठ नेते सुरेश गायकवाड यांचा सवाल​

  

   1         असे आहेत लाभार्थी   
   2    वैद्यकीय अधिकारी      631
   3   परिचारिका    एक हजार 498
   4   आशा वर्कर    एक हजार 530
   5   अंगणवाडी सेविका      पाच हजार 632
   6   फ्रंटलाईन वर्कर      दोन हजार 957
  7  वैद्यकीय सेवा क्षेत्राशी संलग्नीत  (पॅरामेडीकल)     एक हजार 323
  8   मदतनीस स्टाफ      एक हजार 302
  9   लिपीक      390
 10   बहुउद्देशिय कर्मचारी (एमपीडब्लु  एचए)     एक हजार 845
  11  असे एकुण   १७ हजार ९९ लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधकात्मक  लस दिली जाणार आहे. 

 

सहा खासगी रुग्णालये सज्ज 

लस दिल्यानंतर रुग्ण गंभीर परिस्थिती उद्भवल्यास सहा खासगी रुग्णालयात तत्काळ उपचार सेवा दिली जाणार आहे. त्यामध्ये नारायणा मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल (जयभीम नगर), लोटस हॉस्पीटल (डॉक्टर लेन), अश्‍विनी हॉस्पीटल (डॉक्टर लेन), लाईफ केअर हॉस्पीटल (दत्तनगर आण्णा भाऊ साठे चौक), तिरुमला हॉस्पीटल (काबरानगर), रेणुकाई हॉस्पीटल (महाराणा प्रताप चौक) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NANDED: The first dose of vaccine was given to more than 500 frontline workers on Saturday Collector Dr. Vipin Nanded News