नांदेड : विसरलेली तीन लाख रुपयाची बॅग केली परत; कलीयुगातही प्रामाणीकपणा जिवंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

निवघा बाजार (ता. हदगाव) येथे गणेश गव्हाणे यांचे चहाचे हॉटेल आहे. गणेश गव्हाणे व त्यांचे दोन मुल त्यांच्या मदतीला असतात.

नांदेड : विसरलेली तीन लाख रुपयाची बॅग केली परत; कलीयुगातही प्रामाणीकपणा जिवंत

निवघा बाजार ( जिल्हा नांदेड ) : आजच्या धावपळीच्या व कलीयुगात प्रामाणीकपणा जिवंत असल्याची घटना निवघा ( बा ) ता. हदगाव येथे ता. आठ एप्रिल गुरुवार रोजी घडली.

निवघा बाजार (ता. हदगाव) येथे गणेश गव्हाणे यांचे चहाचे हॉटेल आहे. गणेश गव्हाणे व त्यांचे दोन मुल त्यांच्या मदतीला असतात. घरची परीस्थीती बेताचीच असल्याने हॉटेल चालवून मिळणाऱ्या पैशातून घर संसार चालवतात. व्यवसाय करीत असतांना गुरुवार रोजी उमरखेड तालुक्यातील चौघेजण दोन दुचाकी द्वारे मुलीच्या लग्नात ठरलेला हुंडा नेऊन देण्यासाठी जात होते. जातांना निवघा बाजार येथील गणेश गव्हाणे यांच्या हॉटेलात त्या चौघांनी चहा घेतला व चहा घेतल्यावर पैशाने भरलेली बॅग हॉटेलात विसरुन गेले. टेबलवर राहिलेली बॅग गणेश गव्हाणे यांचा मुलगा विशालने उघडून बघीतली असता बॅग मध्ये नोटांचे बंडल दिसले ही बाब मुलाने वडीलाला सांगितली तेंव्हा ती बॅग तशीच जागेवर ठेऊन दिली.

हेही वाचाजालना - नांदेड समृद्धी जोड महामार्गाचा अशोक चव्हाण यांनी घेतला आढावा

चहा पिऊन गेले त्यांचीच बॅग असल्याचे हॉटेल चालकाला खात्री झाली पण त्यांची ओळख ना संपर्क नंबर मग काय करावे या विचारात असतांना ज्यांची बॅग विसरली ते पाच कि. मी. अंतरावर गेल्यावर त्यांच्या लक्षात आले. ते चौघे जण परत आले आणि पैशाची बॅग आहे का अशी विचारणा केल्यावर लगेच हॉटेल चालकाने परत केली. तिन लक्ष रुपयाची बॅग परत केल्यावर त्या चौघांनी सहानूभुती अथवा उपकार केल्याची त्यांनी भावना व्यक्त केली नसल्याची खंत वाटत असल्याचे गणेश गव्हाणे यांनी सांगीतले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Web Title: Nanded Forgotten Bag Rs 3 Lakh Returned Honesty Alive

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..