नांदेडला दिवसभरात २०५ कोरोनामुक्त तर १८० पॉझिटिव्ह; आठ जणांचा मृत्यू

अभय कुळकजाईकर
Tuesday, 6 October 2020

नांदेडला मंगळवारी (ता. सहा आॅक्टोंबर) नव्याने १८० अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे आत्तापर्यंत एकूण रुग्णांची संख्या १६ हजार ६३२ वर जाऊन पोहचली आहे. त्याचबरोबर मंगळवारी २०५ कोरोना बाधित रुग्णांना औषधोपचारानंतर घरी सोडण्यात आले असून आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १३ हजार २१३ एवढी झाली आहे. 

नांदेड - जिल्हा प्रशासनाला मंगळवारी (ता. सहा) प्राप्त झालेल्या ८२९ अहवालांपैकी ६११ अहवाल निगेटिव्ह आले असून १८० अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच उपचार सुरू असलेल्या विविध रुग्णालयातील २०५ रुग्णांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्याचबरोबर दिवसभरात आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी ही माहिती दिली. नांदेडला मंगळवारी (ता. सहा आॅक्टोंबर) नव्याने १८० अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे आत्तापर्यंत एकूण रुग्णांची संख्या १६ हजार ६३२ वर जाऊन पोहचली आहे. त्याचबरोबर मंगळवारी २०५ कोरोना बाधित रुग्णांना औषधोपचारानंतर घरी सोडण्यात आले असून आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १३ हजार २१३ एवढी झाली आहे. 

हेही वाचा - नांदेडला पिक विमा कंपन्यांच्या चौकशीसाठी समिती स्थापन

आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू
कोरोनामुळे दिवसभरात आठ जणांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत ४३९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये नांदेड कौठा पुरूष (वय ७५), लेबर कॉलनी पुरूष (वय ८०), व्यंकटेशनगर पुरूष (वय ७२), छत्रपतीनगर नांदेड पुरूष (वय ६०), चितगिरी (ता. भोकर) पुरूष (वय ८४), कामठा (ता. अर्धापुर) पुरूष (वय ५७), नायगाव पुरूष (वय ५०), रावणगाव (ता. मुखेड) पुरूष (वय ३२) या आठ पुरूषांचा समावेश आहे.

 

बरे होण्याचे प्रमाण वाढले
मंगळवारी आढळून आलेल्या १८० रुग्णांमध्ये नांदेड महापालिका, नांदेड ग्रामिण, अर्धापूर, कंधार, धर्माबाद, लोहा, हदगाव, माहूर, उमरी, मुखेड, नायगाव, किनवट, बिलोली, देगलूर, मुदखेड, परभणी, हिंगोली व यवतमाळ येथील रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, मंगळवारी (ता. सहा) सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात ५९ तर जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल येथे ५१ खाटा रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण सध्या ८२.५३ टक्के इतके आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - नांदेडला चोवीस तासानंतर सापडला डॉ. भगवान जाधव यांचा मृतदेह 

नांदेड कोरोना मीटर

 • एकूण घेतलेले स्वॅब - ८७ हजार ७०१
 • एकूण निगेटिव्ह स्वॅब - ६८ हजार ४७
 • एकूण पॉझिटिव्ह स्वॅब - १६ हजार ६३२
 • आज मंगळवारी पॉझिटिव्ह - १८०
 • एकूण रुग्णालयातून सुटी - १३ हजार २१३
 • आज मंगळवारी सुटी - २०५
 • एकूण मृत्यू संख्या - ४३९
 • आज मंगळवारी मृत्यू - आठ
 • सध्या उपचार घेत असलेले - दोन हजार ८७९
 • अतिगंभीर प्रकृती असलेले - ३३
 • आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या - ४५४

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded free 205 corona and 180 positive in a day; Eight people died, Nanded news