नांदेड : चोरीच्या दुचाकींचे स्पेअर पार्ट विकणारी टोळी जेरबंद, आठ टेम्पोभर मुद्देमाल जप्त- स्थानिक गुन्हे शाखा

प्रल्हाद कांबळे
Friday, 27 November 2020

दुचाकी चोरट्यांकडून विकत घेतलेल्या दुचाकींचे स्पेअर पार्ट वेगवेगळे करुन विकणाऱ्या खुदबेनगर देगलुर नाका भागातील एका भंगार विक्रेत्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. भंगार विक्रेत्यांच्या गोडाऊनमधून सुमारे आठ टेम्पो भरुन स्पेअर पार्ट पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. 

नांदेड : चोरीच्या दुचाकी विकत घेऊन त्याचे स्पेअरपार्ट विकणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती लागली. या टोळीतील तिघआंना पोलिसांनी ताब्यात एघतले असून त्यांच्याकडून विविध कंपन्यांचे दुचाकीचे सुटे भाग जवळपास आठ टेम्पोभर जप्त केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी देगलुर नाका परिसरात गुरुवारी (ता. २६) रात्री आठच्या सुमारास केली. या कारवाईत स्वत:  पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर हे आपल्या सहकाऱ्यासोबत घटनास्थळी हजर होते. 

दुचाकी चोरट्यांकडून विकत घेतलेल्या दुचाकींचे स्पेअर पार्ट वेगवेगळे करुन विकणाऱ्या खुदबेनगर देगलुर नाका भागातील एका भंगार विक्रेत्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. भंगार विक्रेत्यांच्या गोडाऊनमधून सुमारे आठ टेम्पो भरुन स्पेअर पार्ट पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. 

हेही वाचानांदेड : आमदार रातोळीकर यांची पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारानिमित्त नांदेड जिल्हा वकील संघाला भेट -

स्थआनिक गुन्हे शाखेच्या पथकांनी मागील आठवड्यात दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळून चोरलेल्या दुचाकी जप्त केल्या होत्या. दुचाकी चोरीच्या टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर चोरट्यांनी चोरलेल्या दुचाकी भंगारमध्ये विक्री केल्याचे तपासात समोर आले. खुदबेनगर भागात असलेल्या भंगार विक्रेत्याची पोलिसांनी गुप्त माहिती काढली. माहिती प्राप्त झाल्यानंतर गुरुवारी (ता. २६) सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी आपले सहकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक रमाकांत पांचाळ, फौजदार प्रविण राठोड, सलीम बेग, बालाजी हिंगणकर, पद्मा कांबळे आणि संजय जिंकलवाड यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी छापा टाकला. 

कारवाई केलेल्या ठिकाणी गाड्यांचे वेगवेगळे केलेले स्पेअर पार्ट पाहून पोलिसही अव्वाक झाले. गाड्यांची चाके, लागणारे लहान-मोठे पार्ट तसेच गाड्यांचे सांगाडे, इंजीन, हॅन्डल, स्कुटीचे पार्ट आदी सामान खचाखच भरलेल्या घरातून पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला. सुमारे २०० ते ३०० च्या वर दुचाकीचे सामान असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी गाड्यांचे चेसिस नंबर तपासल्यानंतरच निश्चित आकडा समोर येऊ शकतो. पोलिसांनी गोडावून मालक सय्यद अब्बाज अजीम पाशा (वय २०), खालीद हुसेन खुर्शीद हुसेन (वय ३५) दोघे राहणार देगलुर नाका आणि शेख इरफान शेख अन्नास (वय २८) रा. हैदरबाग, नांदेड यांना ताब्यात घेतले आहे. अजून या टोळीतील अन्य आरोपींना ताब्यात घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे यांनी पथकाचे कौतुक केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: A gang selling stolen spare parts of two-wheelers arrested, eight tempo items seized Local Crime Branch nanded news