
नांदेड - जिल्ह्यात मंगळवारी (ता. तीन) दिवसभरात ४० रुग्ण नव्याने पॉझिटिव्ह आढळून आले तर तीन जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दिवसभरात पन्नास जणांवर औषधोपचार करून रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, विविध रुग्णालयात सध्या ४७७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.
नांदेडला मंगळवारी (ता. तीन नोव्हेंबर) सायंकाळी एक हजार १६८ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी एक हजार १२२ अहवाल निगेटिव्ह आले तर ४० अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे १४ तर ॲन्टीजेन टेस्ट कीटद्वारे २६ अहवाल आले आहेत. आत्तापर्यंत एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १९ हजार २४३ झाली आहे. दरम्यान, उपचार सुरू असताना तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृत रुग्णांची संख्या ५१८ झाली आहे. तीन जणांचा मृत्यूमध्ये विष्णुपुरी, नांदेड पुरूष (वय ७१), देऊळगाव (ता. लोहा) पुरूष (वय ६६) आणि विष्णुपुरी, नांदेड पुरूष (वय ४३) यांचा समावेश आहे.
५० रुग्ण कोरोनामुक्त
मंगळवारी दिवसभरात ५० कोरोना बाधित रुग्णांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यामुळे आत्तापर्यंत रुग्णालयातून सुटी दिलेल्या रुग्णांची संख्या १८ हजार ८८ झाली आहे. विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयातील १७, जिल्हा रुग्णालयातील एक, महापालिका अंतर्गत एनआरआय भवन आणि गृह विलगीकरणातील १३, मुखेडमधील आठ, किनवट येथील एक आणि खासगी रुग्णालयातील दहा अशा ५० रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
शासकीय रुग्णालयात १८६ खाटा उपलब्ध
दिवसभरात ४० रुग्ण आढळले असून त्यामध्ये नांदेड महापालिका क्षेत्रात १८, नांदेड ग्रामिण सात, अर्धापूर एक, देगलूर सात, लोहा दोन, उमरी एक, भोकर तीन, मुखेड दोन, हिंगोली एक आणि नागपूर एक असा समावेश आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात ११० आणि जिल्हा रुग्णालय कोविड सेंटर येथे ७६ खाटा रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९७.४३ टक्के आहे. सध्या ४७७ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी ३६ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर आहे.
हेही वाचलेच पाहिजे - गोकुंद्यातील महिला मंडळाच्या कोजागिरीला आले आनंदाचे उधान
नांदेड कोरोना मीटर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.