नांदेडला थोडा दिलासा : बुधवारी ४० रुग्णांची भर, चौघांचा मृत्यू, संख्या पोहचली १५६८ वर  

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 29 July 2020

जिल्ह्यातील आज २० व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी, नांदेड रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या चार जणांचा मृत्यू झाला.

नांदेड : जिल्ह्यात बुधवार (ता. २९) जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या अहवालानुसार ४० व्यक्ती बाधित झाले. जिल्ह्यातील आज २० व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी, नांदेड रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या चार जणांचा मृत्यू झाला.

आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत्त व्यक्तींची संख्या ७४ एवढी झाली आहे. यात ६९ मृत्यू हे नांदेड जिल्ह्यातील असून उर्वरीत सात मृत्यू हे इतर जिल्ह्यातील आहेत. आजच्या एकूण २४२ अहवालापैकी १७९ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता एक हजार ५६८ एवढी झाली आहे. यातील ७९० एवढे बाधित बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आज रोजी ६९३ बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील १५ बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात सात महिला व आठ पुरुषांचा समावेश आहे. आज बरे झालेल्या २० बाधितांमध्ये पंजाब भवन कोवीड सेंटरमधून नऊ, शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी येथून एक, खासगी रुग्णालयातून दहा जणांचा समावेश आहे.

हेही वाचानांदेड पोलीस दलातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा

या परिसरातील आहेत बाधीत रुग्ण

नांदेड शहरातील श्रीनगर एक, फारुखनगर एक, जवाहरनगर एक, शिवकल्याणनगर एक, दिलिपसिंग काॅलनी गोवर्धन घाट सात, मगनपूरा एक, वसंतनगर तीन, शिवाजीनगर दोन, दीपकनगर एक, वजिराबाद एक, पाठकगल्ली दोन, किनवट एक, भाग्यनगर दोन, कौसरनगर चुना भट्टी एक, कल्लारी किनवट एक, एसव्हीएम काॅलनी किनवट दोन, आंध्रा बसस्टॅंड धर्माबाद दोन, लोहा एक, करीम काॅलनी अर्धापूर एक, शेतमजुरवाडी तामसा, हदगाव एक, हेतेपूर कंधार दोन, नविन मोंढा परभणी एक, हिंगोली एक, कळमनुरी एक, पुसद एक, बोरबन नांदेड एक.

येथे आहेत बाधितांवर उपचार सुरु

जिल्ह्यात६९३ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. त्यांना डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे ११७, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे २४९, नायगाव कोविड केअर सेंटर येथे १५, जिल्हा रुग्णालय येथे २७, बिलोली कोविड केअर सेंटर येथे १४, मुखेड कोविड     केअर सेंटर येथे १०६, देगलूर कोविड केअर सेंटर येथे ५६, उमरी १०, हदगाव कोविड केअर सेंटर १३, किनवट कोविड केअर सेंटर येथे तीन, लोहा कोविड केअर सेंटर येथे पाच, कंधार कोविड केअर सेंटर येथे १०, भोकर दोन, धर्माबाद १७, खाजगी रुग्णालयात ४३ बाधित व्यक्ती उपचार घेत असून औरंगाबाद येथे संदर्भित चार, निझामाबाद एक आणि मुंबई एक आहेत.

येथे क्लिक करा - नांदेडात भर दुपारी सराफा दुकानावर दरोडा, सराफा गंभीर, लाखोंचा ऐवज लंपास

जिल्ह्यातील कोरोनाचे आकडे बोलतात

सर्वेक्षण- १ लाख ४८ हजार ६४८
घेतलेले स्वॅब- १३ हजार ४००
निगेटिव्ह स्वॅब- १० हजार ४१९
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- ४०
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- १५६८
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-८
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-१४
मृत्यू संख्या- ७४ 
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- ७९०
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- ६९३
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- ४८२  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded gets some relief:40 more patients on Wednesday, four die, number reaches 1568 nanded news