
नांदेड : एकुलत्या एका मुलीचे लग्न धामधुमीत करण्यासाठी पालकांनी आपल्या आयुष्यभराची कमाई खर्च करण्याचा निर्धार घेतला. त्यानिमित्ताने लग्नाची सर्व तयारी अंतीम टप्यात आली होती. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी म्हणजेच रविवार (ता. १४) फेब्रुवारी रोजी लग्न होते. यामुळे दोन्ही घरची मंडळी लगीनघाईत व्यस्त असताना धक्कादायक घटना पुढे आली. चक्क नवविवाहितेने आपल्या राहत्या घरी लग्न काही तासावर येऊन ठेपले असतानाच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. ११) रोजी घडली. यामुळे उमरी शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.
उमरी शहरात हळद लागण्यापूर्वीच एका नवविवाहितेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मुलीच्या लग्नासाठी घरात जय्यत तयारी सुरु होती. अशाच नववधूने आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शहराच्या व्यंकटेशनगर भागात किराणा दुकान चालविणारे संजय गणेशराव काचावार हे आपल्या कुटुंबियासह राहतात. आपल्या एकुलत्या एका मुलीचे लग्न धामधुमीत करावे यासाठी त्यांनी नांदेड येथे मुलीचे स्थळ शोधले. दोन्ही घरचे पाहूणे एकत्र आल्याने सोयरीक झाली. त्यांनतर ता. १४ फेब्रुवारी लग्नाची वेळ काढली. लग्नात लागणारे सर्व साहित्य, खरेदी करण्यात आली. नातेवाईक व मित्रमंडळींना लग्नाच्या पत्रिका दिल्या. दोन्ही घरी लग्नाची धामधुम सुरु होती.
मात्र अचानक नववधू दुर्गा काचावार (वय २०) हिने गुरुवारी (ता. ११) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी अमावस्या असल्याकारणाने एक दिवस हळदीचा मंडप टाकायचं ठरलं होतं. त्यासाठी मंडपाचे सर्व साहित्य आणून ठेवले होते. काही गोष्टी राहिल्या असल्याने ते खरेदी करण्यासाठी घरती काही मंडळी उमरी शहरात गेली होती. घरात केवळ दुर्गा व तीचे वडील थांबले होते. खरेदी करुन सर्व घरी आल्यानंतर हळदीचा मंडप उभा करण्यात येणार होता. तेवढ्यात वडिलांनी चहासाठी दुर्गाला आवाज दिला. मात्र दुर्गाने काहीच आवाजाला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर घरात जावून पाहिले असता तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब समोर आली. हे कळताच कुटुंबीयांना जबरदस्त धक्का बसला. या प्रकरणी उमरी पोलिस ठाण्यात कुठलीही नोंद करण्यात आली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.