Nanded : ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sarpanch

Nanded : ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग

नांदेड : जिल्ह्यातील १८१ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून ग्रामीण भागामध्ये मोर्चेबांधणीला वेग आला आहे. दरम्यान, निर्धारित कार्यक्रमानुसार ता. १८ डिसेंबर रोजी मतदान आणि ता. २० डिसेंबरला मतमोजणीच्या दिवशी सर्व मतदान केंद्र व मतमोजणी केंद्र परिसरात १४४ कलम लागू करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या मतदान केंद्रापासून व ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे, अशा मतमोजणी केंद्रापासून दोनशे मीटर परिसरातील पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त खासगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी प्रतिबंधीत करण्यात आले आहे. याबाबत जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी आदेश निर्गमीत केले आहेत.

अशा आहेत निवडणुका तालुका आणि गावे

नांदेड तालुका : बळीरामपूर, पांगरी (अ), सिध्दनाथ, मार्कड, चिमेगाव, बोंढार तर्फे नेरली, एकदरा, अर्धापूर तालुका ः डौर, देगाव कुऱ्हाडा, भोकर तालुका ः चिंचाळा प.भो, कोळगाव बु., नांदा खु. मुदखेड तालुका ः वरदडा तांडा हदगाव तालुका ः तालंग, वरंवट/जांभळसावली, मनुला बु., माटाळा, गोर्लेगाव, बेलमंडळ हिमायतनगर तालुका ः दरेगाव किनवट तालुका ः जरुर, अंबाडी, अंबाडी तांडा, अंजी, बेंदी, बेंदी तांडा, बोथ, बुधवार पेठ, भंडारवाडी, भिलगाव, दिगडी म, दरसांगवी सी, दहेली, धावजी नाईक तांडा/दहेली तांडा, दुन्ड्रा, दाभाडी, दिपला नाईक तांडा, धामनदरी, जरुर तांडा,

मलकजाम, मलकजाम तांडा, मारलागुडा, मरकागुडा, माळकोल्हारी, नंदगाव, नंदगाव तांडा, निराळा, पिंपरी, पार्डी खु, पाटोदा खु, पार्डी सी, पाटोदा बु, मारेगाव खा, मोहाडा, रोडा नाईक तांडा, सारखणी, सालाईगुडा, बेल्लोरी ज, चिखली खु, उनकदेव, शनिवारपेठ, वाळकी बु, देवला नाईक तांडा, चिखली बु, पांधरा, पिंपरफोडी, वडोला, तोटंबा, मारेगाव वरचे, भिमपूर, बेल्लोरी धा, पळशी, सकुनाईक तांडा. माहूर तालुका ः तांदळा, पाचुंदा, महादापूर, कुपटी, पवनाळा, लखमापूर, मालवाडा, बोरवाडी, पानोळा, वानोळा, गुंडवळ, इवळेश्वर, बंजारातांडा, पडसा, मच्छिद्र पार्डी, दिगडी पार्डी, दिगडी कु, हिंगणी, शेख फरीद वझरा, मांडवा, दत्तमांजरी, वायफणी, भोरड, रुई, भगवती, लांजी, शेकापुर, वसराम तांडा. धर्माबाद तालुका ः रोशनगाव, आटाळा, बाभुळगाव उमरी तालुका ः

करकाळा, बिलोली तालुका ः गागलेगाव, टाकळी खु, दगडापूर, हरनाळा, भोसी, दौलतापूर, हिप्परगाथडी, कोळगाव, गळेगाव नायगाव तालुका ः सुजलेगाव, अंतरगाव, रुई खु., सातेगांव, पिंपळगाव, तलबिड, ताकबिड मुखेड तालुका ः लोणाळ, सुगाव बु, सुगाव खु/पैसमाळ, कोळगाव, बोरगाव, औराळ, भेडेगाव बु, भेडेगाव खु, हिप्पळनारी, थोटवाडी/सन्मुखवाडी, निवळी, राजुरा ख/ठाणा, चिंचगाव, लिंगापुर, रावणकोळा कंधार तालुका ः जंगमवाडी, लालवाडी, पोखर्णी, सोमठाणा, गुलाबवाडी, नवरंगपुरा, मानसपुरी, गांधीनगर, उमरज, पाताळगंगा, चौकी धर्मापुरी, सावरगाव नि., कोटबाजार, इमामवाडी, दिग्रस खु., घुबडवाडी लोहा तालुका ः पिंपरणवाडी, भेंडेगाव, मडकी, सोनखेड, वाळकेवाडी, पळशी, पारडी, बामणी, खरबी, चिंचोली, नांदगाव, कांजाळ तांडा, कांजाळा, मंगरुळ, काबेगाव, मस्की, हिप्परगा चि, बेरळी खु., पोलेवाडी, घुगेवाडी, कदमाची वाडी, दगडसांगवी, हाडोळी जा. हरणवाडी, लव्हराळ, रिसनगाव, नगारवाडी, लिंबोटी नायगाव तालुका ः मरवाळी/कोपरा देगलूर तालुका ः निपाणी सावरगाव