नांदेड : शेतकरी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड : शेतकरी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन

नांदेड : शेतकरी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन

नांदेड ः केंद्र सरकारने शुक्रवारी (ता.१९) तीन कृषी कायदे वापस घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाचे स्वागत करीत नांदेड येथील डावी लोकशाही आघाडी व जनसंघटनांच्या वतीने शेतकरी आंदोलनातील हुतात्मे व लढवय्या शेतकऱ्यांना अभिवादन केले.

भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, जनता दल (से.) सह वृत्तपत्र विक्रेता संघटना, ईपीएस पेन्शनधारक संघटना आदी संघटनांच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जाहीर केलेल्या निर्णयाचे स्वागत केले. हा निर्णय २०१४ च्या निवडणुकीत १५ लाख प्रत्येकाच्या खात्यात जमा करण्यासारखे आश्वासन ठरु नये याची काळजी मोदी सरकारने घ्यावी. केंद्र सरकारने हाच निर्णय वर्षभरापूर्वी घेतला असता तर आंदोलक शेतकऱ्यांचे ७०० हून अधिक बळी गेले नसते. लखीमपूर सारखी अप्रिय घटना घडली नसती. अशा भावना यावेळी व्यक्त करुन केंद्र सरकारने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर नफ्यासहीत हमीभाव जाहीर करावा. कामगार कायद्यातील बदल रद्द करावेत. वीज विधेयक रद्द करावे आदी मागण्या करण्यात आल्या.

हेही वाचा: काँग्रेसकडून उद्या देशभरात 'किसान विजय दिवस', कार्यक्रमांचं आयोजन

भारतीय कम्युनिस्ट पक्ष कार्यालयात झालेल्या अभिवादन सभेत माजी आमदार गंगाधरराव पटणे, विजय गाभणे, अॅड. प्रदीप नागापूरकर, प्रा.बालाजी कोम्पलवार, गंगाधर गायकवाड, बालाजी पवार, गणेश वडगावकर, एम. आर. जाधव, विनोद गोविंदवार, उज्ज्वला पडलवार, प्रा.लक्ष्मण शिंदे, डॉ. किरण चिद्रावार, सुर्यकांत वाणी, अरुण दगडू, रामचंद्र बलगुजरी, गणेश संदुपटला, गुरुपुठ्ठा, गणेश शिंदे, शिवाजी शेजुळे, मंजुश्री कबाडे, करवंदा गायकवाड, केंद्रे मामा, पावडे आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या पाठपुराव्याला यश : आमदार मोहन हंबर्डे

केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदा आणल्यामुळे शेतकऱ्यांत तीव्र संताप होता. कायद्याविरोधातील आंदोलनात दडपशाही, अत्याचार, केंद्रातील एका मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडी खाली चिरडण्याचा प्रकार घडवला. अशा अनेक अत्याचाराचे परिणाम देशात होणाऱ्या पोटनिवडणुकीवर झाला व जनतेने या तानाशाही सरकारला खाली तोंड करण्यास भाग पाडले. याचाच परिणाम पाहता केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे काळे कायदे रद्द केले आहे. हा निर्णय अगोदरच घेतला असता तर शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते. शेतकऱ्यांनी अहोरात्र दिल्लीच्या सिमेवर आंदोलन केले व त्यांच्या या पाठपुरावला यश आले असल्याचे आमदार हंबर्डे म्हणाले तसेच शेतकऱ्याच्या पीक विम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करुन शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक लवकरात लवकर थांबवावी.

loading image
go to top